Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगाला सतत खाज सुटते का?; मग करा ‘हे’ उपाय

बेकरीमध्ये बनविल्या जाणाऱ्या पदार्थांना बेकिंगसाठी कमी वेळ लागावा या करिता पोटॅशियम ब्रोमेड वापरले जाते. या रसायनाच्या वापरामुळे ब्रेड इत्यादी पदार्थ जास्त वेळ ताजे राहतात आणि त्यांचा आकारही टिकून राहतो.

  • By Nitish Gadge
Updated On: Jul 20, 2021 | 01:00 AM
अंगाला सतत खाज सुटते का?; मग करा ‘हे’ उपाय
Follow Us
Close
Follow Us:

आताच्या काळामध्ये आपल्या खानपानाच्या सवयी आणि आपल्या आसपासचे वातावरण फार झपाट्याने बदलत आहे. प्रदूषण, धूळ, रस्त्यावरील अखंड धावत असणाऱ्या गाड्यांचा धूर, या सर्व गोष्टींमुळे तब्येतीच्या नाना तक्रारी सतत उद्भवत असतात. तसेच अलीकडच्या काळामध्ये सतत फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ यांचे सेवन आपल्या आहारामध्ये वाढल्याने शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. अशामध्ये प्रत्येकाला कशाची ना कशाची अॅलर्जी देखील उद्भवत असते.

[read_also content=”स्टॉबेरी खा, हृदयविकारापासून दूर राहा https://www.navarashtra.com/latest-news/eat-strawberries-stay-away-from-heart-ailments-nrng-158127.html”]

कोणाला धुळीची अॅलर्जी, कोणाला धुराची, कोणाला उन्हाची, तर कोणाला निरनिराळ्या अन्नपदार्थांची. धुळीच्या किंवा धुराच्या मुळे उद्भविणाऱ्या अॅलर्जीच्या परिणामस्वरूप खोकल्याची ढास येणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अश्या तक्रारी दिसून येतात. मात्र अंगाला सतत खाज सुटत असेल, तर ही अॅलर्जी आपल्या आहारातील काही अन्नपदार्थांमुळे असू शकते. अश्या वेळी आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कृत्रिम रंगाचा वापर
आपण खात असलेल्या अनेक अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम खाण्याचे रंग वापरलेले असतात. या रंगांमध्ये अनेक तऱ्हेची रसायने असतात. पिवळ्या रंगामध्ये ऑरामीन आणि मेटानील ही रसायने असतात. याच रसायनांमुळे पेये, मिठाया आणि मसाल्यांना पिवळा रंग येतो. या रसायनांच्या अतिसेवनाने किडनी आणि लिव्हरवर दुष्परिणाम होऊ शकतात. मेटानील या रसायनामुळे आतड्यांच्या लायनिंगला हानी पोहोचू शकते. खाण्याचा कृत्रिम लाल रंग लहान मुलांच्या कँडी, व निरनिराळ्या पेयांमध्ये वापरला जातो. एरीथोसीन रेड आणि अल्युरा रेड या रंगांच्या वापरावर अनेक देशांमध्ये बंदी आहे, कारण हे दोन रंग मानवी शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच खाण्याच्या निळ्या आणि हिरव्या रंगांवर देखील अनेक देशांवर बंदी आहे.

पोटॅशियम ब्रोमेडचा वापर
बेकरीमध्ये बनविल्या जाणाऱ्या पदार्थांना बेकिंगसाठी कमी वेळ लागावा या करिता पोटॅशियम ब्रोमेड वापरले जाते. या रसायनाच्या वापरामुळे ब्रेड इत्यादी पदार्थ जास्त वेळ ताजे राहतात आणि त्यांचा आकारही टिकून राहतो. पण या रसायनाचे दुष्परिणाम मानवी शरीरावर दिसून येत आहेत. या रसायनामुळे हार्मोन्स चे असंतुलन, कर्करोग इत्यादी विकार उद्भवू शकतात. बन सारखे पदार्थ नरम राहण्यासाठी अझोडायकार्बनामाईड सारखे पदार्थ वापरले जातात. या रसायानामुळे श्वसनासंबंधी विकार उद्भविण्याची शक्यता असते.

स्टार्च व फ्रुक्टोज
जॅमसारख्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हलक्या प्रतीच्या स्टार्च, फ्रुक्टोजची मात्रा जास्त असणारे कॉर्न सिरप, आणि साखर या सर्व पदार्थांमुळे जॅम आणि तत्सम पदार्थांचे सेवन हानिकारक ठरू शकते. तसेच यामध्ये वापरले जाणारे सल्फर डायऑक्साईड आणि सॉर्बिक अॅसिड यांच्यामुळे देखील शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

Web Title: Simple home reamedy for itching nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2021 | 01:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.