Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लालबागचा राजा’च्या मंडपात सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटीही सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षारक्षकाने अभिनेत्रीसोबत केली गैरवर्तणूक; Video Viral

लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घ्यायला येणाऱ्या एका हिंदी टिव्ही अभिनेत्रीचे ही प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले. अभिनेत्री तिच्या आईसोबत दर्शनाला गेली होती. यावेळी, तिथे तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 13, 2024 | 02:25 PM
'लालबागचा राजा'च्या मंडपात सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटीही सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षारक्षकाने अभिनेत्रीसोबत केली गैरवर्तणूक; Video Viral

'लालबागचा राजा'च्या मंडपात सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटीही सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षारक्षकाने अभिनेत्रीसोबत केली गैरवर्तणूक; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सध्या गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात राज्यात सेलिब्रेट केला जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर सारख्या महत्त्वाच्या शहरात हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवात सामान्यांपासून ते अगदी बड्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना दिसतात. पण दर्शन घेताना सर्वाधिक हाल होतात, ते सर्वसामान्य माणसाचे आपण असं अनेकदा म्हणतो. पण आता लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घ्यायला येणाऱ्या एका हिंदी टिव्ही अभिनेत्रीचे ही प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले. अभिनेत्री तिच्या आईसोबत दर्शनाला गेली होती. यावेळी, तिथे तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.

हे देखील वाचा – ‘जगातील सर्वात राक्षसी बॉडीबिल्डर’ इलिया येफिमचिक हृदयविकाराच्या झटक्याने 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप हिने नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्रीने दर्शन घेतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने दोघींसोबत घडलेल्या वर्तवणुकीवर भाष्य केले आहे. अभिनेत्रीने कॅप्शन देत घडलेल्या प्रकारावर भाष्य केले आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “लालबागचा राजाच्या मंडपामध्ये घडलेल्या घटनेमुळे माझे मन अस्थाव्यस्थ झाले आहे. आज मी माझ्या आईसोबत ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेले होते. तेथील सुरक्षारक्षक आमच्यासोबत ज्या पद्धतीने वागले, तो अनुभव आमच्यासाठी फार विचित्र होता. माझी आई माझा फोटो काढत होती, ती फोटो काढत असतानाच तेथील सुरक्षरक्षकांनी माझ्या आईच्या हातातून फोन हिसकावून घेतला. होती. मी दर्शन घेत असताना ती माझा फोटो काढत होती. आम्ही दोघीही रांगेत दर्शनासाठी उभे होतो. ती पुढे होती आणि मी मागे. हिसकावून घेतलेला फोन आईने त्यांच्याकडे मागितला असता त्यांनी माझ्या आईला धक्काबुक्की केली.”

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने पुढे लिहिलं की, “जेव्हा मी त्या बाऊन्सरसोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनीही माझ्यासोबत गैरवर्तन केलं. माझ्यासोबत गैरवर्तवणुक करायला केल्यापासूनच मी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केल्यावर त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. (या व्हिडीओमध्ये ओरडणारी मी आहे. “असं करू नका, तुम्ही काय करताय?” मी अभिनेत्री आहे हे कळल्यावर ते परत गेले.”) मला माहित आहे की तिथे खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीला हाताळणे खूप कठीण आहे. पण ते वागत असलेले ही चुकीचेच आहे ना. पण भाविकांसोबत कोणतेही गैरवर्तन न करता योग्य पद्धतीने गर्दी हाताळणे हे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.”

हे देखील वाचा – प्रिया बापटने ‘रात जवां है’मधील स्वतःच्या लक्षवेधी भूमिकेचे श्रेय दिग्‍दर्शक अन् लेखकांना दिले!

पोस्टच्या शेवटच्या भागात सिमरनने लिहिलंय की, “घडलेल्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. व्हिडीओनंतर मंडळाचे सदस्य आणि तिथले सुरक्षारक्षक इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासोबत आदराने वागतील अशी आशा आहे.” अभिनेत्रीसोबत घडलेली घटनापाहून फॅन्स आणि सेलिब्रिटींकडून कमेंट करत तेथील सुरक्षारक्षकांचा निषेध करत आहेत. अभिनेत्री सिमरन बुधरूपसोबतच अशी घटना घडलेली नाही. यापूर्वीही अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत आणि अभिनेत्रींसोबत अशी गैरवर्तवणूकीचा प्रकार घडलेला आहे.

Web Title: Simran budharup had to face misbehavior in lalbaug ganpati pandal her mother was pushed by bouncers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 02:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.