(फोटो सौजन्य-Social Media)
इलिया ‘गोलेम’ येफिम्चिक, ज्यांना “जगातील सर्वात राक्षसी बॉडीबिल्डर” म्हटले जाते त्याचा वयाच्या 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 6 सप्टेंबर रोजी त्याला हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे ते कोमात गेले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांनी 11 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
पत्नीने छातीत दाबून इलियाला बरे वाटण्यासाठी केला प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, इलिया येफिमचिकला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्वरित तिची पत्नी अण्णाने त्याच्या छातीवर दबाव दिला. परंतु त्याचा प्रभाव न झाल्याने त्यांना लगेच हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.
अण्णाने बेलारशियनमधील स्थानिक माध्यमांना सांगितले की, ‘इलियाला बरे वाटेल या आशेने मी खूप प्रयत्न केले आणि प्रार्थना केली. “मी रुग्णालयात रोज त्याच्या जवळ असायची, दोन दिवसांनी त्याचे हृदय पुन्हा धडधडायला लागले, आणि त्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितले की त्याचा मेंदू मृत झाला आहे ही भयानक बातमी दिली,” ती पुढे म्हणाली. “मी त्याच्या शोकांसाठी सर्वांचे आभार मानते. या जगात मी एकटी राहिली नाही हे समजणे खूप आनंददायी आहे, आणि अनेक लोकांनी मला मदत आणि समर्थन देऊ केले आहे,” इलिया येफिमचिकच्या मृत्यू नंतर तिने सगळ्यांचे आभार मानले आणि सांगितले.
जरी त्याने कधीही कोणत्याही व्यावसायिक कार्यक्रमात भाग घेतला नसला तरी बेलारशियन बॉडीबिल्डरचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग होता आणि तो सतत सोशल मीडियावर सक्रिय देखील असायचा. तो नियमितपणे त्याच्या चाहत्यांसह व्हिडिओ शेअर करत होता. ज्यामध्ये तो बॉडीबिल्डींग करताना दिसत असे यावर त्याला चाहत्यांनी “द म्युटंट” हे टोपणनाव देखील पाडले.
एकदा असे नोंदवले गेले होते की त्याने दिवसातून सात वेळा खाल्ले आणि त्याचे शरीर टिकवून ठेवण्यासाठी 16,500 कॅलरीजचा पवार त्याने केला होता, यामध्ये 2.5 किलोग्रॅम स्टेक आणि सुशीचे 108 तुकड्यांचा समावेश होता. इलिया येफिमचिकचे वजन 340 पौड आहे तर त्याची उंची 6 फूट 1 इंच आहे. तसेच, त्याची छाती 61 इंच असून बायसेप्स 25 इंच होती.
हे देखील वाचा- ‘द कराटे किड’ अभिनेता चॅड मॅक्वीनने घेतला जगाचा निरोप, वयाच्या 63 व्या वर्षी झाले निधन!
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत त्याचे वजन फक्त 70 किलो होते आणि तो पुश-अप करू शकत नव्हता. तथापि, नंतरच्या आयुष्यात, तो अरनॉल्ड स्वाझिनेकर आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्यापासून प्रेरित झाला आणि त्याने त्याच्या शारीरिक विकासावर काम करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीदरम्यान इलिया येफिमचिक सांगितले होते, “माझे परिवर्तन हे अनेक वर्षांच्या कठोर प्रशिक्षणाचा आणि शिस्तीचा परिणाम आहे, व्यायामाचे शरीरविज्ञान आणि पोषण करणे आवश्यक आहे.” पुढे ते म्हणाला की, ‘माझे ध्येय लोकांमध्ये कामाची नैतिकता निर्माण करणे आहे जेणेकरून ते त्यांच्या भीतीवर मात करू शकतील.’ असे त्याने सांगितले. इलिया येफिमचिक स्वतःचा आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांचा नेहमी चांगला विचार करत होता.