
ulhasnagar slab collapsed
उल्हासनगर(Ulhasnagar) शहरातील कॅम्प भागात असलेल्या मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब(Slab Collapsed in Ulhasnagar) शनिवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने मोठा अपघात झाला. टेरेसचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत आल्याने इमारतीमधील ३० ते ३२ नागरिक यात अडकले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
Maharashtra: Portion of a building collapses in Ulhasnagar city of Thane district. Officials of Fire & Police Departments are on the spot; 11 people have been rescued & sent to hospital. pic.twitter.com/Gitdjm1OHl — ANI (@ANI) May 15, 2021
माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. काही रहिवाशांनी स्लॅब कोसळताच घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. यावेळी ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तळमजल्यावर ५ ते ६ रहिवासी अडकल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अरुंद रस्ता आणि गल्ली असल्याने बचाव पथकांना मदत कार्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. घटनास्थळी पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी आणि पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
[read_also content=”भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमारच्या अडचणीत वाढ, दिल्लीतील खून प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी https://www.navarashtra.com/sports-news-marathi/non-bailable-warrent-issued-against-olympic-medalist-boxer-sushilkumar-in-delhi-murder-case-nrsr-129406/”]
स्लॅब कोसळलेल्या इमारतीचे नाव मोहिनी पॅॅलेस आहे.ही इमारत १९९४ साली उभारण्यात आली होती.