Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडा संकुलाचे मारुती माने नामकरण अंतिम टप्प्यात; जिल्हा तालीम संघाची माहिती

कुस्तीचा स्वाभिमान आणि जिल्ह्याचे सुपुत्र हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांचे नाव जिल्हा क्रीडा संकुलास देण्यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे यासाठीचे पत्र देखील आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2022 | 05:24 PM
क्रीडा संकुलाचे मारुती माने नामकरण अंतिम टप्प्यात; जिल्हा तालीम संघाची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कुस्तीचा स्वाभिमान आणि जिल्ह्याचे सुपुत्र हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांचे नाव जिल्हा क्रीडा संकुलास देण्यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे यासाठीचे पत्र देखील आले आहे. सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराम मोहिते यांनी ही पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पै. भिमराव माने उपस्थित होते. मोहिते म्हणाले, हिंदकेसरी भाऊंनी अल्पावधीत राज्याचे नव्हे तर देशाचे नाव कुस्तीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचविले. देशाला पदके मिळवून दिली. जिल्ह्याचे नाव जगपातळीवर नेणारे ते एकमेव पैलवान ठरले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माने यांना राज्यसभेत काम करण्याची संधी दिली होती.

तसेच नवी दिल्लीतील एका मार्गाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, जन्मभूमी सांगलीमध्ये एकाही चौकाला अथवा रस्त्याला त्यांचे नाव नाही ही शोकांतिका आहे.

ते म्हणाले, क्रीडा संकुलास हिंदकेसरी भाऊंचे नाव देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि आम्ही काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना 2020 मध्ये या मागणीचे निवेदन दिले आहे. नंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे याबाबत अभिप्राय मागविण्यात आला आहे.

आता हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार, आमदार यांना भेटणार आहे.

पै. मोहिते म्हणाले, स्व. भाऊ यांचे कुस्ती, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातही योगदान आहे. त्यांचे कार्य जिल्ह्याचा स्वाभिमान म्हणून तरुण पिढीसमोर आदर्श म्हणून राहण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा क्रीडा संकुलास त्यांचेच नाव द्यावे, हेच उचित ठरणार आहे.

यावेळी कवठेपिरानचे उपसरपंच सागर पाटील, हिंदकेसरी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद तामगावे, रघुनाथ दिंडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडासंकुलास हिंदकेसरी भाऊंचे नाव देण्यासाठी दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. आदरणीय पै. संभाजी पवार असते तर त्यांनीच स्व. भाऊंचे नाव देण्यासाठी पुढाकार घेतला असता.

– पै. भीमराव माने, माजी जि. प. सदस्य

Web Title: Sports circle name of maruti mane is in final stage nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 05:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.