फोटो सौजन्य- X
टाटा मोटर्स नेक्सॉनची बहुप्रतीक्षित सीएनजी आवृत्ती लवकरच बाजारात आणण्याची अपेक्षा आहे. Tata Nexon CNG ही कार प्रथम या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या भारत मोबिलिटी शोकेसमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार NExon CNg 2 सप्टेंबर रोजी CURVV Coupe-SUV च्या पेट्रोल आणि डिझेल प्रकारांच्या पदार्पणानंतर लॉन्च केले जाणार आहे. आगामी Nexon CNG हे मॉडेल AMT म्हणजेच ऑटोमॅटिकसह दोन गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये एएमटी गिअरबॉक्स असल्यामुळे, नेक्सॉन हे टिगोर आणि टियागो नंतर सीएनजी-एएमटी कॉम्बिनेशन ऑफर करणारे टाटाचे तिसरे कार उत्पादन असणार आहे.
कारची रचना
दरम्यान, Nexon CNG ची रचना आणि लूक ही त्याच्या सध्याच्या मॉडेलनुसारच राहण्याची शक्यता आहे. कारमध्ये सीएनजी असल्याने त्यासंबंधीत काही मेकॅनिकल ॲड-ऑन वगळता बाह्य व अंतर्गत रचना आणि उपकरणे ही Nexon SUV सारखीच असणार आहेत. या नवीन नेक्सॉन मॉडेलच्या बाह्य भागामध्ये काही आयसीएनजी बॅजेस देखील असतील जेणेकरुन ते लाइन-अपमध्ये वेगळे केले जातील.
कारचे इंजिन
Nexon CNG च्या पॉवरट्रेन लाइनअपमध्ये 1.2-लीटर टर्बोचार्ज केलेले 3-सिलेंडर इंजिन त्याच्या पेट्रोल प्रकारात समाविष्ट असेल. यामुळे टर्बोचार्ज केलेले इंजिन असलेले हे भारतातील पहिले CNG वाहन ठरले आहे. सीएनजी, शुद्ध पेट्रोल, डिझेल आणि अगदी ईव्हीचा समावेश असलेल्या वैविध्यपूर्ण पॉवरट्रेन पर्यायांसह नेक्सॉन भारतातील काही मॉडेल्सपैकी एक असेल. नेक्सॉन सीएनजीमुळे ग्राहकांना एसयुव्ही प्रकारामध्ये नवीन पर्याय मिळणार आहे.
हे देखील वाचा-Car Knowledge: कारमध्ये असलेली मात्र माहित नसलेली ‘ही’ महत्वाची वैशिष्टये!
टाटाने अलिकडेच लॉंच केली होती Curvv EV कार
टाटा मोटर्सने Curvv EV दि. 7 ऑगस्ट लॉंच केली होती. आपल्या इलेक्ट्रीक कारमध्ये अजून एक कार जोडली होती. कर्व्ह इव्ही ही कारची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख ते 21.99 लाख रुपयापर्यंत आहे. ही कार ग्राहकांसाठी पाच प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. प्युअर, क्रिएटिव्ह,ॲक्प्लिश्ड, एमपावर्ड स्मार्ट, कर्व्ह इव्ही टाटाच्या डिजिटल शोरूममधून किंवा त्यांच्या इव्ही-ऑन्ली ब्रिक-अँड-मोर्टार डीलरशिपद्वारे खरेदी केली जाऊ शकते. कर्व्ह इव्ही ही टाटा मोटर्सची पाचवी इलेक्ट्रिक कार आहे आणि ती त्यांची फ्लॅगशिप बॅटरीवर चालणारी EV देखील आहे.