वॉर्नच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोक : जागतिक क्रिकेटने शुक्रवारी क्रिकेटविश्वातील एक दुर्मिळ हिरा गमावला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी संपूर्ण महिला संघाने एक मिनिट मौन पाळून शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात आले. खेळाडूंच्या या उपक्रमाला मैदानावर उपस्थित चाहत्यांचीही साथ लाभली.
वॉर्नने शुक्रवारी सकाळी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉड मार्श यांच्या निधनावर ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी मार्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ट्विट ठरले. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने शेन वॉर्न आणि मार्श यांच्या निधनावर मौन पाळत शोक व्यक्त केला.

शेन थायलंडच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता
रिपोर्टनुसार, शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.
१९९९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत सामनावीर
शेन वॉर्न हा एकदिवसीय क्रिकेटमध्येही अतिशय प्रभावी गोलंदाज होता. १९९९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवण्यात वॉर्नने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.