Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगीतकार ल्युई बँक्स यांच्या चरित्राचे प्रकाशन, बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी लावली उपस्थिती!

ल्युई यांनी ५०हूनही अधिक हिंदी चित्रपटांना, इंडो-जॅझ फ्युजन प्रयोगांना संगीत दिले आहे. त्याशिवाय ५०हूनही अधिक स्टेज संगीत कार्यक्रम आणि नाट्य कार्यक्रम केले आहेत. ईंडी-पॉप संगीत, अन्थम संगीत, लघुपट आणि त्याचबरोबर १५,००० जाहिरात जिंगल्स, टीव्ही मालिका शीर्षकगीते यांना त्यांनी संगीत दिले आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Feb 11, 2021 | 04:24 PM
संगीतकार ल्युई बँक्स यांच्या चरित्राचे प्रकाशन, बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी लावली उपस्थिती!
Follow Us
Follow Us:

भारतीय जॅझ चळवळीतील सर्वव्यापी अग्रणी संगीतकार ल्युई बँक्स यांच्या ‘ल्युई बँक्स–अ सिम्फनी ऑफ लव्ह’ या चरित्राचे ११ फेब्रुवारी रोजी त्यांच्या ८० व्या वाढदिवशी मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी संगीत आणि इतर क्षेत्रांतील आघाडीची व्यक्तिमत्वे उपस्थित होती. त्यांमध्ये शंकर महादेवन, तौफिक कुरेशी, रणजीत बॅरोट, फझल कुरेशी, नीलाद्री कुमार, राकेश चौरसिया, भरत दाभोलकर, जीनो बँक्स, नील बँक्स, लॉरेन बँक्स, ओजस अदीया आणि नायाब उधास आदींचा समावेश होता.

या पुस्तकामध्ये ल्युई बँक्स यांच्याबद्दल त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि कलाकारांनी आपली मते मांडली आहेत. या सर्वांनी बँक्स यांना भारतीय जॅझ संगीताचा गॉडफादर म्हटले असून भारतातील फ्युजन संगीतातील एक अग्रणी कलाकार असल्याचे नमूद केले आहे. हा ख्यातनाम कलाकार इतरांपेक्षा कसा वेगळा ठरला आणि आजही ऐंशी वर्षाचा हा कलाकार आपली वंशपरंपरा कशा समर्थपणे पुढे घेवून जात आहे, याबद्दल गौरोवोद्गार काढले आहेत. या पुस्तकामध्ये ज्यांनी आपली मते मांडली आहेत, अशांमध्ये उस्ताद झाकीर हुसेन, ड्रम्स शिवमणी, शंकर महादेवन, पियुष पांडे, रणजीत बॅरोट, अलेक पदमसी, प्रल्हाद कक्कर, ब्रॅझ गोन्साल्वीस, नीलाद्री कुमार, कैलाश सुरेंद्रनाथ, भरत दाभोलकर, उषा ऊथुप आदींचा समावेश आहे.

या पुस्तकामध्ये मान्यवरांची जी मते नोंदविली गेली आहेत, त्यांतील काही महत्वाची उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत –

  • उस्ताद झाकीर हुसेन – त्यांची प्रतिभा अतुलनीय अशीच आहे. ते एक अतुल्य असे संगीतकर आहेत आणि अतिभव्य प्रतिमेचे ऋषितुल्य संगीतगुरु आहेत.
  • शंकर महादेवन – ल्युई यांची माझी ओळख आहे, ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आणि धन्यतेची, तसेच भाग्याची आहे.
  • ड्रम्स शिवमणी – ल्युईंचे स्थान माझ्या हृदयात खूप विशेष असे आहे आणि मी त्यांच्याकडून फार काही शिकलो आहे.
  • पियुष पांडे – स्वतःला खूप गांभीर्याने घेतल्याशिवाय कोणी ग्रेट होत नाही. माझ्यासाठी ल्युई बँक्स यांची महती हीच आहे.
  • ब्रॅझ गोन्साल्वीस – माझ्यासाठी ल्युई हा सर्वोत्तम कलाकार होता आणि कायम राहील. तो सर्वात सर्जनशील, दैवी देणगी लाभलेला, चतुरस्त्र संगीतकार आहे.
  • जो अल्वारेझ – हा जॅझमधील असा दीपस्तंभ आहे की ज्याचे दीपगृह हे नेहमीच अमर्त्य आहे.
‘ल्युई बँक्स – अ सिम्फनी ऑफ लव्ह’ ही या ग्रेट अशा संगीतकाराच्या आयुष्याची व आनंददायी अशा प्रवासाची केवळ एक कथा नाही तर जॅझमध्ये सर्वोत्तम काम केलेल्या आणि आपल्या देशातील जॅझ संगीतातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असेलेल्या अशा या कलाकारावरील ते पहिले पुस्तकदेखील आहे.

जॅझ चळवळीतील ल्युई बँक्स हे एक सर्वव्यापी असे संगीत कलाकार आहेत. त्यांनी दार्जीलिंग येथे अगदी कुमारवयात एका संगीत बँडचे प्रमुख म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. जॉर्ज बँक्स या आपल्या वडिलांकडून त्यांनी जॅझचे आणि संगीतातील आदर्शांचे धडे त्यांनी घेतले. वडील जॉर्ज हे त्यावेळी भारतातील एक सर्वोत्तम ट्रंम्पेटवादक होते. ल्युई यांनी त्यांच्याकडून जॅझमधील बारीकसारीक गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यांत प्राविण्य मिळविले. जिथे आधुनिक तालबद्ध संगीत संकल्पना ही काहीतरी वेगळी गोष्ट मानली जायची अशा देशात ते मोठे झाले होते आणि म्हणूनच त्यांचे भारतीय संगीतातातील योगदान हे अत्यंत महत्वाचे ठरते. जेव्हा त्यांनी एका अत्यंत लोकप्रिय अशा जॅझ बँडचे नेतृत्व केले तेव्हा जॅझ बँडप्रमुख म्हणून त्यांचे नाव झाले. पार्क सेंट कॅलकत्तामध्ये १९७०च्या दशकात त्यांनी ‘ल्युई बँक्स ब्रदरहूड’चे नेतृत्व केले. तेव्हापासून आजतागायत ते जॅझ चळवळीतील अग्रणी नेतृत्व राहिले आहेत. त्यांनी भारताला जॅझच्या नकाशावर एक महत्वाचे स्थान मिळवून दिले असून त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न हे अमूल्य असे आहेत.

ल्युई यांनी ५०हूनही अधिक हिंदी चित्रपटांना, इंडो-जॅझ फ्युजन प्रयोगांना संगीत दिले आहे. त्याशिवाय ५०हूनही अधिक स्टेज संगीत कार्यक्रम आणि नाट्य कार्यक्रम केले आहेत. ईंडी-पॉप संगीत, अन्थम संगीत, लघुपट आणि त्याचबरोबर १५,००० जाहिरात जिंगल्स, टीव्ही मालिका शीर्षकगीते यांना त्यांनी संगीत दिले आहे. दूरदर्शन इंग्रजीच्या बातम्यांची सिग्नेचर ट्यून त्यांनी रचली आहे. त्याशिवाय ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ आणि ‘स्प्रेड द लाईट ऑफ फ्रीडम’ या दोन अत्यंत गाजलेल्या अशा अन्थमना त्यांनी संगीत दिले आहे.

[read_also content=”उंच नभी उडता पतंग…काळ्या साडीत खुललं अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचं सौंदर्य, पाहा तीच्या हळदीकुंकवाचे खास फोटो! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/marathi-actress-sharmishta-raut-after-marriage-first-haldi-kunku-nrst-88678/”]

त्यांनी कॅडबरीच्या ‘क्या स्वाद है’, हमारा बजाज, ब्रिटानियाच्या ‘टिंग टिंग टी टिंग’ यांसारख्या जाहिरात जिंगल्सना संगीत दिले आहे. या चरित्राचे लेखन आशिष घटक यांनी केले आहे. त्यांनी या पुस्तकावरील संशोधनासाठी चार वर्षे खर्ची घातली आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक रूपा पब्लिकेशन ही संस्था आहे.

Web Title: The release of louis banks character the presence of bollywood legends nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2021 | 04:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.