जय ठाकरे
तारासावंगा (Tarasawanga). तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चिचकुंभ, पेठ, माणिकवाडा, जामगाव शेतशिवारात (Wadegaon, Chichkumbh, Peth, Manikwada and Jamgaon farms) मागील सहा महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार (free of leased tigers) आहे. तारासावंगा भागात (In the Tarasawanga area) पट्टेदार वाघाने सोमवारी पहाटेच्या सुमारास वासरावर हल्ला करून त्याचा फडशा फाडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
[read_also content=”मुंबई/ लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा; अनंत गाडगीळ यांचे राज्य सरकारला आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/now-consider-the-economy-along-with-the-lockdown-anant-gadgil-appeal-to-the-state-government-nrat-136144.html”]
तारासावंगा येथील शेतकरी संजय नामदेव ठोंबरे (farmer Sanjay Namdev Thombre) यांच्या मालकीच्या वासरावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून गतप्राण केले. यामुळे शेतकरी ठोंबरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत. मान्सूनचा पाऊस पडला की, शेतात पेरणीकरीता शेतक-यांची शेतांकडे धाव असते. त्यानंतर पिकांच्या रखवालीकरीता अशातच शेतशिवारातही वाघ मुक्तसंचार करीत असल्याने या भागातील शेतक-यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष म्हणजे या भागात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाने शेतक-यांच्या गाई-गुरांवर हल्ले करून गतप्राण केले आहे. ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. परंतु, याकडे वनविभागाने सातत्याने दुर्लक्षच केले आहे.
सध्या खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतामध्ये मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकरी जात आहेत. वाघाचा दिवसाढवळ्या मुक्तसंचार सुरू असल्याने आता शेतकर्यांमध्ये पेरणीच्या तोंडावार वाघाची दहशत पसरली आहे. नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.