Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा ; संगीता खैरनार बनल्या ‘मिसेस ग्लोबल युनिर्व्हस’

मिसेस ग्लोबल २०२१ सौंदर्य स्पर्धेत एकूण ५ र्फेया घेण्यात आल्या. त्यामध्ये पोषाख फेरी, बुद्धीमत्ता (टॅलेन्ट), संगित (नृत्य) यासह आधी शुटींग झालेला राऊंड आणि पाचवा आणि शेवटचा बुद्धीमत्ता आणि हजरजवाबीपणाचा कस पाहणारा प्रश्‍नोत्तर राऊंड अशा प्रकारात स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये पहिल्या फेरीत संगीत यांनी भारतातील वैभवशाली वैशिष्टांचे सादरीकरण असलेला सुमारे २५ किलोचा लेहंगा परिधान करुन उपस्थितांची मने जिंकली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 10, 2021 | 02:09 PM
नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा ; संगीता खैरनार बनल्या ‘मिसेस ग्लोबल युनिर्व्हस’
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : दुबई (यूएई) येथे झालेल्या मिसेस ग्लोबल युनिव्हर्स २०२१ सौंदर्य स्पर्धेैत येथील संगीत खैरनार यांनी ‘मिसेस ग्लोबल युनिव्हर्स किताबावर नाव कोरले. यासह मिसेस डीओटी किताबाचाही मुकूट त्यांनी आपल्या आकर्षक व्यक्तीमत्वाने पटावला. संगीत खैरनार यांच्या यशाने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दुबईत झाली स्पर्धा
सौंदर्यासह तल्लख बुद्धीमत्ता, हजरजवाबीपणा, अनुभवातून मिळवलेले ज्ञान आणि प्रभावीपणे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून स्वत:ला सादर करण्याची हतोटी या सर्वांचा कस पाहणार्‌या मिसेस ग्लोबल युनिर्व्हस किताबावर संगीता खैरनार यांनी नाव कोरले. नुकत्याच दुबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील ४२ सौंदर्य ललनांनी भाग घेतला. त्यामध्ये अनेक सौंदर्यवतींना मागे टाकत संगीत यांनी या मानाच्या किताबवर नाव कोरले. विशेष म्हणजे त्यांनी मिसेस डीओटी या किताबाचा मुकूटही आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले.

पारंपरिक पाेषाख
मिसेस ग्लोबल २०२१ सौंदर्य स्पर्धेत एकूण ५ र्फेया घेण्यात आल्या. त्यामध्ये पोषाख फेरी, बुद्धीमत्ता (टॅलेन्ट), संगित (नृत्य) यासह आधी शुटींग झालेला राऊंड आणि पाचवा आणि शेवटचा बुद्धीमत्ता आणि हजरजवाबीपणाचा कस पाहणारा प्रश्‍नोत्तर राऊंड अशा प्रकारात स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये पहिल्या फेरीत संगीत यांनी भारतातील वैभवशाली वैशिष्टांचे सादरीकरण असलेला सुमारे २५ किलोचा लेहंगा परिधान करुन उपस्थितांची मने जिंकली. या पोषाखात भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ यांसह भारतीय संस्कृती आणि वैशिष्ट्‌ये दर्शवणारा पारंपरिक पोषाख परिधान करुन कॅटवॉक केला. नंतर झालेल्या सर्व फेरीत त्यांनी ’ब्यूटी विथ ब्रेन’मध्येही त्यांनी यश संपादन केले.

नथ पाेहाेचली जगभर
स्पर्धेदरम्यान अनेक देशांच्या सौंदर्यवतींशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृती, नऊवारी साडी आणि नथ असा पोषाख जगभर प्रसिद्ध करत नथीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. संगीता खैरनार यांंनी या आधीही अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत किताब पटकावले आहेत. यापूर्वी मलेशियातील क्वालंपूर येथे झालेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल- २०२० सौंदर्य स्पर्धेतही त्यांनी मिसेस इंडिया इंटरनॅशनल विजेतेपद पटकावले आणि मिसेस क्विन ऑफ हार्टस हे सबटायटलही मिळवले. या यशाचे श्रेय त्या आपल्या पतीला देतात.

या किताबांनी सन्मान
यापूर्वीही संगीत यांनी नाशिक येथे त्यांनी मिसेस ल्यूमियर क्विन- २०१९ किताब व मिसेस ब्युटिफुल हेअर सबटायटल पटकावले. यासह सोबत सौंदर्य वैभव, तेजस्वीनी, राष्ट्रीय समाज गौरव अचिव्हर्स गोल्ड मेडल अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळवले. संगीत या औषध निर्माण शास्त्रातून डिप्लोमा केला असून त्यांना पाककलेची आवड आहे. संगीत, गायन, नृत्य, अभियन असे अनेक छंद त्यांनी जोपसले आहेत. त्या योग विशारद असून विविध भाषांवर त्यांचे प्रभूत्त्व आहे. या सौंदर्य स्पर्धेत ४० ते ४२ देशांतील प्रतिनिधींंनी भाग घेतला तरीही संगीत यांनी आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन करुन सर्वांना मागे टाकले.

Web Title: The trumpet of honour in the head of nashik sangeeta khairnar becomes mrs global youth nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2021 | 02:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.