
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोज वेगवेगळे गौप्यस्टोट करणाऱ्या मंत्री नवाब मलीक यांनी आता आणखी एक सूचक इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपली दिवाळी मंगलमय होवो. पुढे मलिक यांनी म्हटले आहे की, ‘होटल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज़…’
NCB ने मुंबईतील क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा टाकल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर त्याची चर्चा वाढली. त्यात ऐन दिवाळीत नवाब मलिक यांनी ‘हॉटेल द ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, रविवारी भेटू.’ असं म्हणत ट्वीट केल्याने पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय हो होटल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
त्याआधी नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”
दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटवर भाजपचे मोहित भारतीय यांनी रिट्विट करत प्रतिउत्तर दिलं आहे. अब बात निकलेगी तो फिर दूर तलकही जायेगी, अब डरो मत भागो मत, तुम्हारे हर पाप का सवाल पूछा जाए गा! असं ट्विट करत मोहित भारतीय यांनीही इशारा दिला आहे.
नवाब मलिक यांच्या या ट्विटवरून त्यांनी मोठा धमाका करण्याची योजना आखल्याचे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे आता मलिक कोणता नवीन धमाका करतायत हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.