नागपूर (Nagpur). देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं (Second Wave) थैमान घातलं होतं. एकीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं (Delta plus variant)डोकं वर काढलं आहे. त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाटेचा (Third Wave) धोका असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. डेल्टा प्लस (Coronavirus New Strain)या व्हेरिएंटचे 7 जिल्ह्यांमध्ये 21 रुग्ण आढळून आले. त्यात एकाचा मृत्यू देखील झाला.
[read_also content=”मुंबई/ अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची मराठी भाषा विभागात बदली : सात सनदी अधिका-यांच्या बदल्या https://www.navarashtra.com/latest-news/additional-chief-secretary-pravin-pardeshi-transferred-to-marathi-language-department-transfer-of-seven-chartered-officers-nrat-149219.html”]
या व्हेरिएंटमुळे राज्यातल्या विविध भागात कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्याची शक्यता वैद्यकीय संशोधकांकडून व्यक्त करण्यात आली. तसंच भारतीय वैद्यकीय चिकित्सा अनुसंधान परिषदेनं (ICMR) देखील या वृत्ताला दुजोरा दिला. या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा अभ्यास करण्यात येणार आहे. नागपुरातील (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी गेल्या 7 दिवसांत 100 नमुने गोळा करण्यात आले असून ते आता पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत.
[read_also content=”रेतीतस्करांचा कारनामा/ वैनगंगा नदीचे अख्खे पात्रच खरवडून नेले; महसूल विभाग झोपेत आहे का? https://www.navarashtra.com/latest-news/the-work-of-sand-smugglers-the-whole-river-wainganga-was-washed-away-is-the-revenue-department-asleep-nrat-149193.html”]
पुण्यातल्या NIVमधील व्हायरसचे अभ्यासक या नमुन्यांमधील व्हायरसच्या जनुकीय साखळीचा अभ्यास करतील या अभ्यासाचा अहवाल प्राप्त होण्यासाठी आणखीन 5 ते 7 दिवस लागणार आहे. त्यामुळे या जनुकीय साखळीच्या संधोधनातून काय निष्कर्ष निघेल याकडे सर्वाचंच लक्ष लागून राहिलं आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा जनुकीय अभ्यास करण्यासाठी व्हायरॉजिच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नमुने पाठवण्यात आलेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात कोरोनानं दोन्ही लाटेत धुमाकूळ घातला. विदर्भातल्या नमुन्यांमध्ये व्हायरसचे पाच नवे स्ट्रेन आढळून आले होते.
दरम्यान नव्यानं मेडिकलमधून जिनोम फ्रिक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आलेल्या 100 नमुन्यांच्या अहवालातून काय समोर येते, याकडे विदर्भाकराचं लक्ष लागून राहिलं आहे.