तासगांव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त अंजनी (ता तासगाव) येथे त्यांची समाधी असलेल्या निर्मळ स्थळावर विनम्र अभिवादन करण्यात आले. आई भागिरथी, पत्नी आमदार सुमन पाटील, कन्या स्मिता, सुप्रिया, मुलगा रोहित, बंधू राजाराम, सुरेश यांसह आबांच्या कुटूंबियांनी समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते व मान्यवरांनी समाधीस्थळी येऊन अभिवादन केले.
खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर, सुहास बाबर, युवकचे ताजुद्दीन तांबोळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, युवक राष्ट्रवादीचे विराज नाईक, सिकंदर जमादार, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, जिल्हा परिषदेचे सतिश पवार, संजय पाटील व अर्जुन माने, पंचायत समिती सभापती संजय जमदाडे, माजी सभापती संभाजी पाटील, कमल पाटील, मनिषा माळी, उपसभापती डाॅ. शुभांगी पाटील, गट विकास अधिकारी दीपा बापट, जिल्हा नियोजन समिती सदस्य रविंद्र पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती नवनाथ मस्के, उपसभापती विवेक शेंडगे यांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
ॲड आर. आर. पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील, तानाजीराव घाटगे, माजी चेअरमन अमोल पाटील, स्वामी रामानंद भारती सुतगिरणीचे व्हा. चेअरमन पतंग माने, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्ता हावळे, आबांचे स्विय सहायक बाळासाहेब गुरव, पी. एल. कांबळे, तहसिलदार रविंद्र रांजणे, अमोल शिंदे, डाॅ. भारती पाटील, करण पवार, नदीम तांबोळी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
महांकाली उद्योग समूहाच्या अध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या अनिता सगरे, शंतनू सगरे, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा साधना कांबळे, महादेव माळी, हायुम सावनुरकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महेश पवार, दादासाहेब कोळेकर, चंद्रकांत हाक्के, पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, तहसिलदार बी. जे. गोरे गट विकास अधिकारी उदय कुसूरकर यांनी अभिवादन केले.
महिला आघाडीच्या कवठेमहांकाळ तालुका अध्यक्षा सुरेखा कोळेकर, भानूदास पाटील, दत्ताजीराव पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, दिग्विजय शिंदे, नचिकेत पाटील, कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नूतन नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबांच्या समाधीचे दर्शन घेतले.