मुंबई : दोन्ही अधिवेशनात तसेच मुख्यमंत्री झाल्यापासून मागील दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेले नाहीत. राज्याचा कारभार मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून करणे अपेक्षित असताना ते घरी बसून राज्यकारभार करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीच्या जोरावर मुख्यमंत्री पद मिळवले आहे असा थेट आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला.
उत्तर प्रदेशसह चार राज्यात मतदारांनी भाजपला कौल देत भाजपकडे एक हाती सत्ता सोपवली आहे. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या चार राज्यांना विधानसभा निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. भाजपला मिळालेल्या या यशाचा जल्लोष मुंबईतील भाजप कार्यालयात करण्यात आला. तसेच भाजपला मिळालेल्या या घवघवीत यशाचा कल्याण-डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आमदार गायकवाड यांनी हा आरोप केला.
[read_also content=”निकालानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया ; म्हणाले- ‘भारतासाठीचा निर्णय 2024 मध्ये होईल, कुठल्याही राज्याच्या निकालामुळे नाही” https://www.navarashtra.com/india/prashant-kishors-reaction-after-the-verdict-the-decision-for-india-will-be-taken-in-2024-not-because-of-the-results-of-any-state-nrab-253064.html”]