UPI युजर्सना मिळेल नवीन सर्व्हिस
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सोमवारी जगभरातील सर्व देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी UPI One World Wallet लाँच करण्याची घोषणा केली. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय व्हिजिटर्सना सहज, रिअल-टाइम डिजिटल पेमेंट अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
UPI वन वर्ल्ड वॉलेट, जे गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान पहिल्यांदा सादर करण्यात आले होते, ते आता अनेक देशांतील व्हिजिटर्ससाठी उपलब्ध असेल. आता परदेशी लोक मेड इन इंडिया तंत्रज्ञानाची सुविधा वापरू शकतात. यामुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज आणि परकीय चलन व्यवहारातील अडचणी बऱ्याच प्रमाणात दूर होतील.
हेदेखील वाचा – रिचार्ज न करता डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घ्या! Airtel युजर्सना मिळते ‘ही’ विशेष सुविधा
पासपोर्ट आणि व्हॅलिड व्हिसावर आधारित पूर्ण KYC प्रक्रियेनंतर अधिकृत PPI जारीकर्त्यांद्वारे UPI वन वर्ल्ड वॉलेटचा लाभ घेता येतो. NPCI चे प्रवक्ते म्हणाले की, ही सेवा सुरू करण्यामागचा उद्देश लोकांना परदेशातून येणाऱ्या लोकांच्या अडचणी कमी करणे हा आहे. याद्वारे त्यांना UPI ने सुसज्ज करून त्यांचा अनुभव सुधारण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे. UPI भारतीयांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पेमेंट पर्याय आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय प्रवासी UPI वन वर्ल्ड वापरून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात.
हे सोयीस्कर लोडिंगला अनुमती देते. परदेशी प्रवाशांना भारताने विकसित केलेल्या रिअल-टाइम पेमेंट प्रणालीचा अनुभव घेता यावा यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी फक्त QR कोड स्कॅन करून व्यापारी स्थानांवर पेमेंट करण्यासाठी UPI One World ॲपचा वापर करू शकतात. ही सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली एनपीसीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.