मागेच भारतातील सर्व प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपले रिचार्जच्या किमतीमध्ये भरघोस वाढ केली आहे. त्यानंतर आता प्रत्येक प्लॅनच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. या गोष्टीला कंटाळून आता अनेकजण तर आपले सिम कार्डदेखील चेंज करत आहेत. त्यातच आता जर आम्ही तुम्हाला सांगितले की, रिचार्ज न करताही तुम्ही डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकता तर… तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या विशेष योजनांमुळे आता हे शक्य आहे.
तुम्ही देखील एअरटेल युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला इमर्जन्सी व्हॅलिडिटी फॅसिलिटी (Airtel Emergency Validity Loan) या योजनेविषयी माहिती देणार आहोत. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी, एअरटेलने प्रीपेड युजर्सना दिलेली ही सुविधा केव्हा आणि कशी काम करते, हे समजून घेणे आवश्यक आहे.
वास्तविक, एअरटेल आपल्या युजर्सना इमर्जन्सी व्हॅलिडिटी सुविधा प्रदान करते. या सुविधेसह, एअरटेल प्रीपेड ग्राहकांना 1.5GB डेटा आणि मोफत कॉलिंगची सुविधा प्राप्त होते. तथापि, हे लक्षात घेणे फार गरजेचे आहे की, कंपनी ही सुविधा फक्त एक दिवसाच्या व्हॅलिडिटीसह प्रदान करते. यातील चांगली गोष्ट म्हणजे, डेटा आणि फ्री कॉलिंगच्या या सुविधेसाठी एअरटेल यूजरला कोणत्याही प्रकारचे रिचार्ज करण्याची गरज लागत नाही.
हेदेखील वाचा – चोरी झालेल्या फोनमधून घरबसल्या डिलीट करा UPI ID ! फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा
इमर्जन्सी व्हॅलिडिटी सुविधा अशा प्रीपेड युजर्सना उपयुक्त ठरते, जे युजर्स एकदा प्रीपेड रिचार्ज केल्यानंतर, पहिल्या योजनेची व्हॅलिडिटी संपल्यानंतरच पुन्हा फोन रिचार्ज करतात. म्हणजेच तुमचा रिचार्ज संपल्यानंतर तुम्ही या सुविधेचा फायदा घेऊन तुमचा संपलेला रिचार्ज पुन्हा चालू करू शकता.
एअरटेलचे ग्राहक या सुविधेचा लाभ चॅनलद्वारे घेऊ शकतात. प्री-कॉल अनाऊंसमेंटच्या द्वारे IVR चा वापर केला जाऊ शकतो. एअरटेल युजर्स फोनवरून *567*2# USSD कोड टाकू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो, कंपनी पुढील रिचार्जमध्ये या कर्जाची भरपाई करते. पुढील रिचार्जमध्ये एकूण व्हॅलिडिटीमधून एक दिवस वजा केला जातो.