नागपूरात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस नागपूरात भयंकर हिट वेव्हचा इशारा नागपुरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे(Warning of a terrible heat wave in Nagpur for the next two days; Regional Meteorological Department warning).
नागपूरात पारा 44 अंशसेल्सियस पर्यंत पोहचला असून नागरिक उकड्यापासून हैराण झाले आहेत. उत्तर भारतातील मुख्यत्वे राजस्थान मधून उत्तर-पश्चिम च्या दिशेने येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज पासून नागपूरात पुढील 2 दिवस हिट वेव्ह आणि त्यानंतर 3 दिवस सिव्हियर हिट वेव्ह चा इशारा दिला आहे.
त्यामुळे येणारे 5 दिवस नागपूर उष्ण राहण्याची शक्यता आहे. नागपूर सह अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता नागपुर च्या प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी उन्हात 12 ते 4 या वेळेत अनावश्यक घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत. नागपुर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा आवश्यक असेल तरच संपुर्ण काळजी घेत घराबाहेर निघावे असे आवाहन केले आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध शितपेयाचा आधार घेत असून व्यापाऱ्यांनी दुकानात हिरव्या जाळ्यांचे शेड उभारून उन्हापासून बचाव करतांना पाहायला मिळत आहे. घरोघरी नागरिकांनी आपल्या अंगणात सावली आणि थंडावा निर्माण व्हावा यासाठी हिरव्या जाळ्या उभारल्या आहेत.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]