पंजाबमधील खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Waris Punjab De chief Amritpal Singh) गेल्या काही दिवसापासुन खळबळ माजवतोय. गुरुवारीच त्यांच्या समर्थकांनी पंजाब मधील अजनाळा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्याच्या समर्थकाच्या सुटकेसाठी गोंधळ केला. त्यांनतरही तो काही ना काही वादग्रस्त विधानं करत आहे. ‘खलिस्तानचा आत्मा कायम राहील आणि त्याला कोणीही मारु शकणार नाही. असं त्याने म्हण्टलंय. वारंवार अशी वादग्रस्त विधानं करणारा अमृतपाल सिंग नेमंका कोण आहे आणि ज्या संघटनेचा तो प्रमुख आहे. ती संघटना म्हणजे वारिस दे पंजाबचं नेमकं काम काय आहे जाणुन घेऊया.
[read_also content=”‘हिंसा ही पवित्र गोष्ट आहे, 1947 पूर्वी भारत नव्हता, पंजाब वेगळा देश होता’! अमृतपाल सिंगनं पुन्हा ओकली गरळ https://www.navarashtra.com/india/khalistani-amritpal-singh-controversial-statement-violence-is-sacred-there-was-no-india-before-1947-punjab-was-a-separate-country-nrp-371971.html”]
ज्या अमृतपालच्या नावाने सगळा गोंधळ सुरु आहे ते त्याने नेमकं काय केलं ते जाणुन घ्या. अमृतपालचा समर्थक लवप्रीत तुफानवर बरिंदर सिंग यांचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलिस ठाण्याचा ताबा घेतला. यावेळी समर्थकांच्या हातात बंदुका, तलवारी, काठ्या होत्या घेत पोलिस स्टेशनमध्ये चांगलाच गोंधळ घातला. सुमारे आठ तास चाललेल्या गोंधळानंतर पोलिसांनी लवप्रीत तुफानला सोडण्यास तयार झाल्यानंतर आंदोलन थोड शांत झाला.
अवघ्या चार महिन्यांपूर्वी अमृतपाल सिंगने वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुखपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. अमृतपाल हा अमृतसरमधील जंदुपूर खेरा या गावचा रहिवासी आहे. 2012 पूर्वीही अमृतपालचे कुटुंब दुबईला गेले होते. तेथे कुटुंबाने वाहतुकीचे काम सुरू केले. 2013 मध्ये त्यानेही या कामात कुटुंबिायंना मदत केली. ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल दुबईहून एकटाच पंजाबला आला होता. ऑक्टोबरमध्ये अमृतपाल यांनी जर्नेलसिंग भिंद्रवाला यांच्या रोडे गावात ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.यावेळी आयोजित कार्यक्रमात अमृतपाल यांनी स्वत:ला जर्नेल सिंग भिंद्रनवाला यांचा अनुयायी असल्याचे सांगून शीख तरुणांना पुढील युद्धासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. त्याच्याकडे चौकशी सुरू झाली. वडिलोपार्जित गावात तपासासाठी गेलेल्या गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, तो खूप लाजाळू असल्याचे लोकांनी सांगितले. अभ्यासातही तो सरासरी होता. त्याला दुबईतच खलिस्तानी विचारसरणीचा धडा शिकवण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या पंजाबी गायक दीप सिद्धूने ही संघटना सुरू केली होती आणि त्यांना अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते. सामाजिक कार्यासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. मात्र, दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि नंतर ही संस्था अमृतपालने आपल्या ताब्यात घेतली. दीप सिद्धूच्या कुटुंबीयांनीही त्याच्यावर संस्थेला हायजॅक केल्याचा आरोप केला आहे. तरुणांना शीख धर्माच्या मार्गावर आणणे आणि पंजाबी जनतेला त्यांचे अधिकार आणि हक्कांबाबत जागकरु करणे. पंजाबच्या ‘स्वातंत्र्याचा’ लढा या तत्वावर चालणं हे सुद्धा सुरुवातीपासुन विवादात्मक राहिलं आहे.