महिलांचा मेंदू हा पुरूषांच्या तुलनेत ८ टक्के लहान असतो असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र मेंदूचा आकार लहान असूनही कोणतेही काम पूर्ण करण्यात महिलाच पुरूषांच्या तुलनेत अधिक तत्पर आणि कार्यक्षम असतात असे संशोधकांना दिसून आले आहे. मेंदू लहान असूनही महिला आणि पुरूषांच्या बुद्धीमत्तेत फरक नसतो असे न्यूरोसायंटिस्टना आढळले आहे. या संदर्भात कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस, तसेच स्पेनमधील माद्रिद विद्यापीठातील संशोधकांनी हे विशेष संशोधन केले आहे.
या संशोधकांना असे आढळले की महिलांच्या मेंदूचा आकार छोटा असतो पण महिलांचा मेंदू अधिक कार्यतत्पर असतो आणि कोणतेही काम पूर्ण करताना मेंदूतील कमी पेशी आणि कमी उर्जा वापरूनच महिला कामे पूर्ण करतात. १८ ते २५ वयोगटातील ५९ महिला आणि ४५ पुरूष या प्रयोगासाठी निवडले गेले होते. स्मरणशक्ती, बुध्दिमत्ता, भावना याबाबत मेंदूतील हिप्पोकॅम्पस हा भाग महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
[read_also content=”चीनच्या वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन; म्हणे आता बाप्येही होणार बाळाची आई https://www.navarashtra.com/latest-news/anything-huh-good-research-by-chinese-scientists-he-said-that-now-the-father-will-also-be-the-mother-of-the-baby-nrvb-144129.html”]
महिलांच्या मेंदूतील हा भाग काम करताना कमी उर्जा वापरतो तसेच मेंदूच्या पेशींचा वापरही माफक करतो असेही संशोधनात आढळले आहे. महिला गणिती कौशल्यातही पुरूषांना मागे टाकतात तसेच बदलत्या परिस्थितीची नोंद महिलांचा मेंदू फार जलद घेतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. ट्रेव्हर रॉबिन्स या संशोधकाच्या मते महिलाच्या मेंदूचा आकार लहान असल्याने त्याच्या मेंदूच्या नसा अधिक जवळ असतात व त्यामुळे कदाचित संदेश दळणवळणाचे काम अधिक गतीने आणि वेगात पार पाडले जात असावे.
Women are more active than men Learn how