demand for bicycles doubled during the corona virus crisis
सायकल चालवणे (Cycling) हे आता शालेय आयुष्यापुरते किंवा व्यायामासाठी जिममध्ये किंवा ज्यांना सायकल आवडते त्यांच्यापुरते मर्यादित राहिले आहे. खरंतर, सायकल चालवणे (Cycling) हा एक उत्तम व्यायाम आहे. धकाधकीच्या, तणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे.
[read_also content=”शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पाहा पक्षप्रवेश सोहळा Live https://www.navarashtra.com/latest-news/mla-of-rural-dhule-is-back-in-congress-party-again-nrsr-137370.html”]
सायकल चालवल्यानं हृदय (Heart) आणि फुफ्फुसांचे (Lungs) आरोग्य चांगले राहते. सकाळी सायकल चालवल्यामुळे दिवसभर ऊर्जा (Energy) मिळते आणि रात्री झोपही (Sleep) चांगली येते. आज जागतिक सायकलिंग दिवस (World Cycling Day 2021) आहे. या निमित्ताने सायकल चालवण्याचे काही फायदे जाणून घेऊ या…