Year Ender 2024: वर्षभरात टॉप सर्चमध्ये राहिली भारतातील ही 5 ठिकाणे, तुम्ही भेट दिली की नाही?
ऋतू किंवा प्रसंग कोणताही असो, फिरण्याचे आणि प्रवासाचे नियोजन हे नेहमीच केले जाते. नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे, लोकं फूड एक्सप्लोर करणे, बाजारपेठेचा आनंद घेणे आणि नवीन वातावरणात तणावापासून दूर कुटुंब आणि मित्रांसह विश्रांतीचे क्षण घालवणे हे प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वर्षभर लोक कुठल्या ना कुठल्या ना कुठल्या कारणाने फिरण्याचे नियोजन करत असतात. वास्तविक, धावपळीच्या दैनंदिन जीवनातून विश्रांती घेणे हा एक चांगला मार्ग मानला जातो.
कोठे प्रवास करायचा, कोणते ठिकाण पाहणे चांगले आहे आणि तेथे काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी, लोक अनेकदा Google वर प्रवासाची ठिकाणे शोधतात आणि या वर्षी भारतातील कोणती ठिकाणे सर्वाधिक भेट दिली आहेत. त्यातच आता 2024 मध्ये भारतातील कोणती ठिकाणे सर्वाधिक शोधली गेली याची एक लिस्ट गुगलने जारी केली आहे. वास्तविक, दरवर्षी डिसेंबर महिन्यात, Google सर्च लिस्ट जारी करतो, ज्यामध्ये ते वेगवेगळ्या गोष्टींची लिस्ट रिलीज करतो. यामध्ये ट्रॅव्हल सेक्शनमधून भारतातील टॉप 10 सर्च केलेल्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापैकी 5 ठिकाणे भारतातील आहेत, ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत. तुम्हीही फिरण्याचा विचार केला असेल तर आपल्या लिस्टमध्ये तुम्ही या ठिकाणांचा समावेश करू शकता.
Year Ender 2024: यावर्षी जोडप्यांचे सर्वात आवडते हनिमून डेस्टिनेशन बनली ही 5 ठिकाणं
मनाली
भेट देण्याच्या ठिकाणांपैकी मनाली हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सर्च केले गेलेले ठिकाण ठरले. मनाली हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे आहे. हे ठिकाण इतके सुंदर आहे की येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. हिमालयातील सुंदर दऱ्या पाहण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. सुंदर दृश्यांव्यतिरिक्त, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग आणि ट्रेकिंग सारख्या साहसी क्रियाकलापांसह येथे अनेक ऍक्टिव्हिटीज देखील आहेत.
जयपूर
या यादीत, जयपूर, ज्याला पिंक सिटी म्हणून देखील ओळखले जाते, हे ठिकाण पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानची भव्य संस्कृती आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जयपूर हे एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तूंनी भरलेले जयपूर खरेदीसाठीही खूप प्रसिद्ध आहे. जयपूरला जाताना हवा महल, बिर्ला मंदिर आणि जंतर मंतर सारखी ठिकाणे पाहिली पाहिजेत.
अयोध्या
राम मंदिराच्या उद्घाटनामुळे यंदा अयोध्या फार चर्चेत राहिले. या यादीत अयोध्या आठव्या क्रमांकावर आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या बालस्वरूपाला समर्पित असलेल्या अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन यावर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आले, ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक हजेरी लावण्यासाठी आले होते. श्री रामजन्मभूमी व्यतिरिक्त, आपण हनुमान गढी मंदिर, सरयू नदी घाट इत्यादीसारख्या अनेक सुंदर आणि धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. तसेच, इथे गेलात तर अयोध्येतील स्थानिक खाद्यपदार्थ चाखायला अजिबात विसरू नका.
तुम्ही भारतातील लंडन कधी पाहिले आहे का? इथे अवघ्या 5000 रुपयांत लुटता येतो Honeymoon चा आनंद
काश्मीर
पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरला गुगलच्या या यादीत 9व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. हिमालयाच्या खोऱ्यात वसलेले काश्मीर नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. दल सरोवर, गुलमर्ग, शालीमर्ग अशी अनेक ठिकाणे काश्मीरमधील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हिवाळ्यात बर्फवृष्टी पाहण्यासाठी गुलमर्ग एक सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही दल लेकमध्ये शिकारा राइड करू शकता किंवा स्नो स्कीइंग सारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज करू शकता.
दक्षिण गोवा
गोवा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गुगलच्या टॉप सर्चमध्ये दक्षिण गोव्याला दहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले. समुद्रकिना-यावर वसलेले गोवा दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच इथला अनुभवही फार मजेदार आहे. तुम्ही येथे विविध समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊन आपल्या सुट्टीचा मनमुरादपणे आनंद लुटू शकता. गोव्याचे स्थानिक खाद्यपदार्थ आणि चवदार मिष्टान्न एकदा ट्राय करायला विसरू नका. इथे सीफूड फार प्रसिद्ध आहे.