फर्टिलिटी वाढविण्याचे सोपे उपाय
आजकाल, स्त्री आणि पुरुष दोघेही प्रजनन समस्यांशी झुंजत आहेत. अनेक अभ्यासांनीही हे सत्य मान्य केले आहे. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की आज जगभरातील अनेक लोक या समस्येशी झुंजत आहेत. महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्याविषयी उघडपणे बोलले जात असले, तरी पुरुष वंध्यत्वासारख्या विषयांवर लोक क्वचितच बोलतात. पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंची कमी संख्या, शुक्राणूंची खराब हालचाल, शुक्राणूंची कमतरता, हार्मोनल असंतुलन, अनुवांशिक समस्या, अडथळा इत्यादीसारख्या अनेक समस्यांचा समावेश होतो.
चुकीची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, झोपेची चुकलेली पद्धत, जास्त ताण इत्यादी अनेक कारणांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होताना दिसत आहे. याशिवाय अनेक प्रकारचे आजारही पुरूषांना् वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखतात. याबाबत गुडगावच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या प्रजनन तज्ज्ञ डॉ. रश्मी अग्रवाल यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तसंच पुरुष त्यांचे प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी काय करू शकतील यांच्या काही सोप्या टिप्सदेखील त्यांनी दिल्या आहेत (फोटो सौजन्य – iStock)
फोन दूर ठेवा
फोनपासून ठेवा अंतर
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या वाय-फाय सिग्नलचादेखील शुक्राणूंची गतिशीलता आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त, स्मार्टफोनमधील निळा प्रकाश शरीराच्या नैसर्गिकरित्या मेलाटोनिन तयार करण्याच्या क्षमतेस अडथळा आणतो. मेलाटोनिन शुक्राणूंचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते, जे शुक्राणूंचे उत्पादन कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत मोबाईल पँटच्या खिशात ठेवणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
हेदेखील वाचा – पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
स्वच्छतेची काळजी
अंतर्गत स्वच्छता राखा
रोग आणि संक्रमण टाळण्यासाठी, स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. बाथरूम वा वॉशरूम वापरल्यानंतर आपले हात धुणे, गुप्तांगांच्या सभोवतालची स्वच्छता राखणे आणि चांगल्या फॅब्रिकपासून बनविलेले अंतर्वस्त्र आणि बॉटम्स घालणे. तसंच टाईट कपडे न घालणे योग्य ठरते.
संतुलित आहार
आहारामध्ये संतुलन असणे गरजेचे
जंक आणि प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब या आजारांसोबतच ते प्रजनन आरोग्यालाही हानी पोहोचवतात. अंडी, बेरी, अक्रोड आणि शक्य तितकी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. त्यामध्ये प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स सारखे पोषण असते, ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच पण Sperms Count देखील वाढतो.
नियमित व्यायाम
हलका मात्र नियमित व्यायाम हवाच
रोज थोडासा व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. जर तुम्ही खूप व्यस्त असाल, तर फक्त 30 मिनिट्स रोज वेगाने चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे अनेक रोगांचा धोका कमी होतो आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे पुरेसे आहे. हेदेखील लक्षात घ्या की जास्त व्यायाम आणि वर्कआउट्सदेखील शुक्राणूंची गुणवत्ता कमी करू शकतात.
हेदेखील वाचा – 100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान
व्यसन करणे टाळा
व्यसनापासून दूर रहा
जास्त धुम्रपान आणि मद्यपान केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो. दररोज मद्यपान केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होऊ शकते. तर धुम्रपान केल्याने शुक्राणूंची गती कमी होते आणि वंध्यत्वाला कारणीभूत ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.