फोटो सौजन्य: Freepik
आज हाय ब्लड प्रेशरच्या आजाराने न जाणो कितीतरी लोक त्रस्त आहे. यात काही लोकं असे सुद्धा आहे ज्यांना हा आजार असून सुद्धा माहीत नाही आहे. हाय बीपीची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात, ज्यामुळे ते वेळेत ओळखले जात नाही आणि समस्या अधिकच गंभीर होऊ लागते. या कारणास्तव या आजाराला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात.
जर वेळेत या आजाराचे निदान नाही केले तर याचे परिणाम तुम्हाला हार्ट अटॅक कीव स्ट्रोकच्या रूपात दिसू शकतात. त्यामुळेच हाय ब्लड प्रेशरचे काही लक्षणं तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
चक्कर येणे: सकाळी उठल्यानंतर तुम्हाला डोकेदुखी किंवा चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर कदाचित याचे कारण तुमचे हाय ब्लड प्रेशर असू शकते.
अंधुक दृष्टी: सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला अंधुक दिसत असेल तर ते हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते. म्हणूनच, जर तुम्हाला चष्मा लागला नसेल आणि झोपेतून उठल्याबरोबर तुम्हाला धूसर दिसत असेल, तर तुमचा बीपी नक्कीच तपासा.
थकवा: जर तुमची पूर्ण झोप झाल्यानंतरही सकाळी थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीराची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. हे बीपी वाढल्यामुळे देखील होऊ शकते.
कोरडे तोंड: हाय ब्लड प्रेशरचे एक लक्षण म्हणजे कोरडे तोंड किंवा वारंवार तहान लागणे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर तुमचे तोंड कोरडे पडत असेल तर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा धोका असू शकतो.
नाकातून रक्त येणे: सकाळी उठल्यानंतर नाकातून अचानक रक्त येणे हे देखील हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते.
श्वास घेण्यास त्रास: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा नीट श्वास न घेणे हे देखील हाय ब्लड प्रेशरचे लक्षणं आहे.