जगातील सर्वात उंच ६ पुतळे
मानवजातीला नेहमीच उंच आणि भव्य वास्तूंविषयी आकर्षण वाटते. याचाच पुरावा म्हणजे प्राचीन इजिप्तमधील पिरॅमिडपासून ते आज आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारती व पुतळ्यांपर्यंतची वाटचाल. आजही जगभरात विविध देश उंच पुतळ्यांच्या माध्यमातून आपले सामर्थ्य आणि संस्कृती दर्शवत आहेत. पुतळ्यांच्या बाबतीत अमेरिका स्थित स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा बराच काळ सर्वात उंच पुतळा म्हणून गौरव केला जात होता. मात्र, आता ही पदवी भारतातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने मिळवली आहे. जगातील ५ सर्वात उंच पुतळे कोणते आहेत आणि त्यांच्यामागची वैशिष्ट्ये काय आहेत.याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे..
स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमधील नर्मदा नदीच्या काठावर आहे. हा भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. त्याची उंची ५९७ फूट म्हणजेच १८१ मीटर आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. तो सुमारे चार स्टॅच्यू ऑफ लिबर्टीइतका उंच आहे. २०१८ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील विविध संस्थानांना एकत्र करणाऱ्या सरदार पटेल यांच्या सन्मानार्थ हे बांधण्यात आले आहे.
PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
चीनमधील स्प्रिंग टेम्पल येथील भगवान बुद्धांची मूर्ती ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे. त्याची उंची ४२० फूट म्हणजेच १२८ मीटर आहे. या प्रचंड तांब्याच्या पुतळ्याला बांधण्यासाठी ११ वर्षे लागली. त्याचे बांधकाम १९९७ ते २००८ पर्यंत चालू राहिले. त्यानंतर, भारतात स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधला गेला नाही तोपर्यंत, सुमारे एक दशकापर्यंत जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून या पुतळ्याने नाव ठेवले.
इंडोनेशियातील भगवान विष्णूची मूर्ती ही जगातील १० सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे. तिला हिंदू देवतांची सर्वात उंच मूर्ती म्हणून मान मिळाला आहे. ती इंडोनेशियातील बाली येथे आहे. ती ३९३ फूट म्हणजेच १२० मीटर उंच आहे. त्याचे बांधकाम १९९० मध्ये सुरू झाले, परंतु २०१८ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. डिझाइनपासून बांधकामापर्यंत २८ वर्षे लागली.
बेडशीट बदलण्याचा कंटाळा येतोय? सुस्त राहू नका! ‘या’ आजारांना पडाल बळी
जगातील चौथी सर्वात उंच मूर्ती देखील भगवान बुद्धांची आहे, जी जपानमध्ये आहे. त्याचे नाव उशिकु दैबुत्सु आहे. ही जगातील सर्वात उंच कांस्य मूर्ती आहे. १९९५ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले गेले. त्याची उंची देखील १२० मीटर आहे.
म्यानमारमध्ये स्थापित केलेला हा पुतळा देखील भगवान बुद्धांचा आहे. तो बांधण्यासाठी १२ वर्षे लागली. २००८ मध्ये त्याचे अनावरण करण्यात आले. त्याची उंची ३८० फूट म्हणजेच ११५ मीटर आहे. ही मूर्ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा सुमारे अडीच पट उंच आहे आणि जगातील तिसरी सर्वात उंच मूर्ती आहे.
ही भगवान शिवाची मूर्ती जगातील १० सर्वात उंच मूर्तींमध्ये समाविष्ट आहे. ती भारतातील राजस्थानमध्ये बांधण्यात आली आहे. या मूर्तीचे नाव विश्वस्वरूपम आहे. त्याची उंची ३६९ फूट म्हणजेच ११२ मीटर आहे. ती राजस्थानमधील नाथद्वारा येथे आहे आणि १२ मैल अंतरावरून दिसते. त्याचे बांधकाम २०२२ मध्ये पूर्ण झाले.