Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नातं तोडणारा नाही तर जोडणारा ‘घटस्फोट’! काय आहे Sleep Divorce? जो जोडीदारांना आणतो जवळ

‘Sleep Divorce’ म्हणजे केवळ झोपेच्या वेळेस एकमेकांना स्पेस देऊन नात्यातील तणाव कमी करण्याची एक सकारात्मक पद्धत आहे. यामुळे वैयक्तिक शांतता टिकते आणि नात्यातील भावनिक गुंतवणूक अधिक मजबूत होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2025 | 07:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

घटस्फोट म्हणजे एखाद्या नात्याला संपवणार धार धार अस्त्र! या अस्त्राचा वार झाला तर नात्याचे दोन तुकडे होतात. असे तुकडे की दोन जीव शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वेगळे होऊन जातात. घटस्फोटाला भारतात नात्याचा प्रखर शत्रू समजला जातो, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की घटस्फोटाचेही प्रकार असतात. अशामध्ये एक प्रकार म्हणजे ‘Sleep Divorce’.

तळपायांमध्ये सतत आग होते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, शरीरात दिसून येतात मोठे बदल

नावाने जरी वेगळा वाटत असला तरी ‘Sleep Divorce’ हा पारंपरिक घटस्फोटापेक्षा खूप वेगळा आणि वास्तवात नातं अधिक मजबूत करणारा प्रकार आहे. अनेकांना ‘Divorce’ हा शब्द ऐकून नकारात्मक वाटू शकते, पण Sleep Divorce नात्यातील तणाव किंवा दुरावा वाढवण्याऐवजी तो कमी करण्याच्या उद्देशाने केला जातो. अनेकदा नात्यामध्ये जितकी जवळीक आणि एकत्र वेळ घालवणं गरजेचं असतं, तितकंच एकमेकांना ‘Space’ देणंही तेवढंच आवश्यक असतं. सततचं एकत्र असणं कधी कधी वैयक्तिक शांतता आणि मनःशांती हिरावून घेऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे कुरबुरी, चिडचिड, निद्रानाश आणि मानसिक थकवा नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

Sleep Divorce म्हणजे एकाच घरात राहूनही झोपेसाठी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा बेडवर झोपणं. यामध्ये दिवसाचा उरलेला वेळ एकत्र घालवला जातो, संवाद केला जातो, प्रेम आणि सहवासाचा अनुभव घेतला जातो, मात्र झोपेच्या वेळेस एकमेकांना आवश्यक ती वैयक्तिक जागा आणि शांतता दिली जाते. त्यामुळे दोघांनाही झोप पूर्ण होण्यास, शरीर-मन ताजं ठेवण्यास आणि दुसऱ्या दिवशीच्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडण्यास मदत होते.

या प्रकारातून दोघांनाही स्वतःच्या भावना आणि समोरच्याच्या भावना समजून घेण्यास वेळ मिळतो. झोपेच्या वेळेत मिळणारा हा वैयक्तिक वेळ नात्यातील भावनिक गुंतवणुकीला टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. अन्यथा, झोपेत येणारे व्यत्यय, सवयीतील फरक किंवा लहानसहान वाद नात्याच्या गाठी सैल करू शकतात. Sleep Divorce हे त्या टोकाच्या स्थितीपर्यंत पोहोचण्याआधीच एक उपचारात्मक पर्याय म्हणून पाहिलं जातं, जे नात्याला टिकवून ठेवण्यात आणि प्रेमाला अधिक खोल बनवण्यात मदत करतं.

डेड स्किनमुळे त्वचा खराब झाली आहे? त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, वॉश वापरणं कराल बंद

भारत देशात अशा प्रकारचा घटस्फोट सहसा पाहायला मिळत नाही. पण पाश्चिमात्य देशांमध्ये याचा फार प्रभाव आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये 35% जोडपे Sleep Divorce चे पालन करत आहेत. या Divorce मध्ये होणार नुकसान म्हणजे नात्यात शारीरिक संबंध असणे आवश्यक आहे, याने दोन्ही जीव शारीरिक आणि भावनिकरीत्या जोडले जातात. परंतु, Sleep Divorce मध्ये बेडटाईम इन्टिमेन्सी जवळजवळ बंद होते. कधी कधी यामुळे नात्यात दुरावा वाढण्याची शक्यता असते. जोडप्यांना एकटेपणा जाणवू लागतो.

Web Title: A divorce that does not break a relationship but rather connects it what is sleep divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • relationship advice
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
1

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा
2

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
3

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?
4

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.