Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजीच्या डोळ्यातलं पाणी आणि मुलींचा स्वार्थ; आईच्या मायेपुढे प्रॉपर्टी मोठी ठरली !

आजीला भेटायला गेलो आणि नात्यांचं कटू वास्तव समोर आलं,आजीच्या डोळ्यातलं पाणी आणि मुलींचा स्वार्थ; मन सुन्न करणारा अनुभव.जन्मदात्या आईकडून पैशांची मागणी; एक नातं हरवल्याची वेदना

  • By Dilip Bane
Updated On: Jun 09, 2026 | 05:20 PM
म्हातारपणात प्रॉपर्टीसाठी होणारा कौटुंबिक स्वार्थ

म्हातारपणात प्रॉपर्टीसाठी होणारा कौटुंबिक स्वार्थ

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी आजीला बघायला गेलो होतो. ती सध्या गावी राहत नाही, ती तिच्या मुलीकडे म्हणजे माझ्या मावशीकडे राहते. तिच्या पेन्शनसाठी ती गावी आली होती. मला बघितल्यावर ती भावुक झाली. डोळ्यात पाणी आलं. “पोरा, आलास! असंच कधीतरी बघायला ये मला,” असं म्हणाली. कामातून वेळ काढता येत नाही, हे तिला सांगता येत नाही. जेवढे दिवस होतो तेवढे तिच्या सानिध्यात घालवले.

पण काही गोष्टी ज्या मी फक्त ऐकल्या होत्या, त्या प्रत्यक्ष मी कानाने ऐकत आणि डोळ्यांनी पाहत होतो. ज्या मावशीकडे ती राहत होती, तिची अशी डिमांड होती की, “मी तुला बघत आहे तर सगळं माझ्या नावावर कर,” म्हणजे घर, बँकेतले पैसे. त्यासाठी ती माझ्या आजीशी भांडताना पाहिलं.शिव्या देताना ऐकलं. “तू आजीला असं का बोलतेस?” म्हणून विचारलं, तर माझ्यावरच हात उगारला. चित्र फार चांगलं नव्हतं. स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस हैवान होतो.प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण शब्दांना मर्यादा होत्या. त्या ओलांडायला शब्द तयार नव्हते. स्वतःला थांबवलं, जिभेवर ताबा ठेवला.त्या वेळी एक गोष्ट कळली, ती म्हणजे कोणीही कोणाचं नसतं. आजीला पाहिलं. तिचा चेहरा माझ्याकडे होता. तिची नजर जणू माझ्याकडे याचना करत होती, “सोडव रे मला या जाचातून.”

 आधी राग आला ! मग थोडा विचार केला की महत्त्वाचं काय आहे.जी मावशी स्वतःच्या आईसाठी खरंतर मुलं म्हणून आपलं कर्तव्य पार पाडायला हवं, आई-वडिलांची जिवंतपणी काळजी घ्यायला हवी. त्या मोबदल्यात आपल्याच जन्मदात्या आईकडून पैशाची मागणी करणे हे फार भयंकर होतं माझ्यासाठी.

आजोबांच्या पेन्शनमधून ती तिचं उर्वरित आयुष्य जगत आहे. कल्पना करा, आजोबांनी जर काही करून ठेवलं नसतं तर आजीची काय अवस्था झाली असती. स्वतःच्या सख्ख्या मुली प्रॉपर्टीसाठी तिला बघत आहेत, नाहीतर त्यांना काही फरक पडत नाही.बघून फारच बेकार वाटलं. असं वाटत होतं आजीला उचलावं आणि सरळ माझ्या घरी आणावं. खरंतर माझं घर दुसऱ्या मजल्यावर आहे, बाथरूम बाहेर आहे. रूमसुद्धा लहान आहे, १० बाय १२ ची. आजीसाठी फार सुलभ नाही, आजीला माझ्या घरी आणलं तरी तिचं करणार कोण, हा प्रश्न होता.आईची तब्येतही फारशी चांगली नाही. मीही हतबल होतो. आईने सुद्धा माघार घेतली होती. मावशीकडे ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

वास्तव पाहिलं तर फार वाईट आहे. नातं पैशापेक्षा मोठं नाही हे पाहिलं. स्वार्थ पाहिला, तिची अवहेलना पाहिली, हतबलता पाहिली. म्हातारपण लहान मुलांसारखंच असतं. इथे आपली सख्खी मुलंसुद्धा आपली नसतात. आजोबा असते तर त्यांनी आजीची नक्कीच काळजी घेतली असती.त्या वेळी मी स्वतःला हरताना पाहिलं राक्षसीवृत्ती जिंकत होती. आजीचं हतबलता पाहण्यातिरिक्त मी काहीही करू शकलो नाही.

Web Title: A grandmothers pain and the truth about family relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Family
  • Lifestyles
  • love story
  • relationship

संबंधित बातम्या

प्रेमसंबंध लग्नापर्यंत पोहोचले नाहीत म्हणून फसवणूक ठरत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
1

प्रेमसंबंध लग्नापर्यंत पोहोचले नाहीत म्हणून फसवणूक ठरत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral
2

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.