Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ कराल तर व्हाल आपल्याचं मुलांचे शत्रू ; पालकत्वाविषयी काय सांगते चाणक्यनिती ,वाचा

पालकांनी यासाठी आपला वेळ सार्थकी लावावा, चांगले काम करावे. यासाठी सर्व लोकांनी आपले काम म्हणजेच कर्तव्य पार पाडले पाहिजे. जे पालक मुलांची काळजी घेत नाहीत, त्यांना प्रत्येक क्षणी आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते.

  • By Aparna Kad
Updated On: May 06, 2022 | 04:16 PM
‘हे’ कराल तर व्हाल आपल्याचं मुलांचे शत्रू ; पालकत्वाविषयी काय सांगते चाणक्यनिती ,वाचा
Follow Us
Close
Follow Us:

आचार्य चाणक्यांनी आपल्या ग्रंथामध्ये थोर तत्वज्ञान लिहून ठेवलं आहे. जे आजच्या जीवनाशीही तंतोतंत जुळलं जातं. त्यांच्या चाणक्यानितीमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख पाहायला मिळतो. नीति शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. यात मुलांच्या संगोपनावर लक्ष वेधलं गेलं आहे. पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या वाईट संस्कार होऊ नये यासाठी प्रयत्नशील असावं. पालकांनी यासाठी आपला वेळ सार्थकी लावावा, चांगले काम करावे. यासाठी सर्व लोकांनी आपले काम म्हणजेच कर्तव्य पार पाडले पाहिजे. जे पालक मुलांची काळजी घेत नाहीत, त्यांना प्रत्येक क्षणी आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. चाणक्य नीतीनुसार जाणून घेऊयात की मुलांची काळजी कोणत्या प्रकारे घेतली पाहिजे.

पुत्राश्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः।
नीतिज्ञाः शीलसम्पन्ना भवन्ति कुलपूजिताः।।

चाणक्य नीतिच्या दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्ञानी पुरुषांनी आपल्या मुला-मुलींमध्ये चांगले गुण वाढवले ​​पाहिजेत. कारण नीति जाणणारा आणि चांगले गुण असणारी सभ्य स्वभावाची व्यक्तीच कुटुंबात पूजली जाते. चाणक्य म्हणतो की, लहानपणी ज्या पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जाईल, त्याच पद्धतीने त्यांचे जीवनही विकसित होईल, त्यामुळे त्यांना अशा मार्गावर मार्गदर्शन करणे हे पालकांचे कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांच्यात कौशल्याबरोबरच नम्रताही विकसित होईल. केवळ सदाचारी लोकच कुटुंबाची शोभा वाढवतात.

माता शत्रु पिता वैरी येन बालो न पाठितः।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा।।

अकराव्या श्लोकात लिहिले आहे की, ते पालक हेच मुलांचे भविष्यात शत्रू होतात. ज्या पालकांनी मुलांना शिक्षण दिले नाही, कारण अशिक्षित मुलाला विद्वानांच्या गटात बसता येत नाही, त्याला नेहमी तुच्छतेची वागणूक मिळते. . बगळा हंसांच्या कळपात असतो तसा विद्वानांच्या गटात त्याचा अपमान केला जातो. नुसता मनुष्य जन्म घेऊन बुद्धिमान होत नाही. त्याच्यासाठी शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे. रूप, आकार आणि प्रकार सर्व मानवांचे सारखेच असतात, फरक त्यांच्या विद्वत्तेतूनच दिसून येतो. जसा पांढरा बगळा पांढऱ्या हंसांमध्ये बसून हंस बनू शकत नाही, त्याचप्रमाणे अशिक्षित माणूस सुशिक्षित लोकांमध्ये बसून शोभा वाढवू शकत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे, जेणेकरून समाजात त्याची प्रतिष्ठा वाढेल.

लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः।
तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत्।।

बाराव्या श्लोकात असे लिहिले आहे की, अति लाड केल्याने पुत्रांमध्ये अनेक दोष निर्माण होतात. तसेच वेळीच आवर घातल्याने आणि शिक्षा केल्याने त्यांना चुकीची जाणीव होते. म्हणून पुत्र आणि शिष्यांचे जास्त लाड करू नयेत, त्यांना शिक्षा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आई-वडिलांनी अतिप्रेम केल्याने मुलांच्या दोषांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे मुलांनी काही चुकीचे काम केले तर त्यांना अगोदरच समज देऊन त्या चुकीच्या कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा एखाद्या मुलाने चूक केली असेल तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याचे लाड करणे योग्य नाही. केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षाही झाली पाहिजे जेणेकरून त्याला योग्य-अयोग्य समजेल.

Web Title: Aacharya chanakyas chanakyaniti on parenting read what chanakya says about it nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2022 | 04:13 PM

Topics:  

  • chanakya
  • chanakyaniti

संबंधित बातम्या

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
1

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य
2

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.