डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी जग्गी वासुदेव यांच्या टिप्स
मधुमेह हा असाध्य आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवूनच निरोगी आयुष्य जगता येते. मधुमेहामध्ये रक्तातील साखर वाढू लागते ज्यामुळे शरीराला अनेक गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. मधुमेह आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जर डायबिटीस असेल आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून असाल तर आता वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
अनेक मधुमेही रुग्ण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे याबद्दल संभ्रमात असतात. साहजिकच, मधुमेहाच्या रुग्णांना अशा गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज हळूहळू शरीरात सोडले जाते जेणेकरून साखरेची पातळी अचानक वाढू नये. ईशा फाऊंडेशनचे संचालक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी याबाबत आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. मधुमेहाच्या रूग्णांसाठी नाचणी हे सर्वोत्तम अन्न ठरू शकते, जे रक्तातील साखरेचे उत्तम व्यवस्थापन करण्यास मदत करते, जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
काय खाणे योग्य?
मधुमेही व्यक्तींनी नाचणी खावे
सद्गुरुंनी सांगितले की तांदूळ किंवा गहू याव्यतिरिक्त नाचणी हे एक असे अन्न आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम अन्न आहे. याचे कारण म्हणजे नाचणी खाण्याने साखर फार लवकर वाढत नाही. तसंच नाचणी शरारीत ग्लुकोज खूप हळू सोडते. जीवघेणा मधुमेह असलेल्या रुग्णांनी नाचणीचे सेवन करावे असा सल्ला सद्गुरूंनी दिला आहे. नाचणी व्यतिरिक्त, इतर अनेक धान्य आहेत, जे साखर रुग्णांसाठी चांगले पर्याय आहेत.
हेदेखील वाचा – मधुमेह होण्यापूर्वी शरीर देते 5 संकेत, दुर्लक्ष केल्यास जीव गमवाल!
डायबिटीसच्या रूग्णांनी काय खावे?
नाचणी खाण्याचे कारण
मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी पांढरा तांदूळ आणि गव्हाला चांगला पर्याय म्हणून नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, नाचणीमध्ये असणारे फायबर हे पोटातील भूक कमी ठेवते आणि पचनाची गतीदेखील राखते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि डायबिटीस वाढत नाही.
नाचणीमधील पोषक तत्व
नाचणी खाल्ल्याने नक्की काय होते
नाचणीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात तांदूळ, मका किंवा गहू यांच्या तुलनेत पॉलिफेनॉल, कॅल्शियम आणि आवश्यक अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात असते. नाचणीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी भरपूर असते जे हाडांसाठी चांगले असते. याशिवाय नाचणीत प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
हेदेखील वाचा – रात्रीच्या झोपेशी आहे डायबिटीसचे थेट कनेक्शन, चुकाल तर 59% धोका वाढेल
नाचणी कशी खावी?
नाचणीचे विविध पदार्थ
आपल्या आहारात नाचणीचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नाचणीची भाकरी, नाचणीचे धिरडे, नाचणीची इडली, नाचणीचा डोसा. याशिवाय तुम्ही स्प्राउट्सच्या रूपात आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही नाचणीचे सत्वदेखील नाश्त्यात खाऊ शकता.
नाचणीचे फायदे
नाचणी खाण्याचे आरोग्याला फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.