Sign Of Prediabetes: मधुमेह हा एक गंभीर आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांना सध्या होताना दिसतोय. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे हे घडते. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि अंधत्व यांसह अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पण यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही. मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, ज्याला प्रीडायबेटिस म्हणतात त्याचे काही संकेत शरीर देत असते. हे संकेत तुम्ही ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटणे आणि तुमच्या रक्तातील साखरेची तपासणी करणे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या संकेत (फोटो सौजन्य - iStock)
डायबिटीस हा कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र त्याचे काही संकेत तुम्हाला आधीच मिळतात ते जाणून घ्या
जर तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त वेळा लघवी करत असाल, विशेषत: रात्री, तर तुमचे शरीर अतिरिक्त ग्लुकोज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे डायबिटीस होण्याचे लक्षण आहे
तुम्हाला सतत तहान लागत असेल आणि पाणी पित असाल तर हेदेखील प्रिडायबिटीक लक्षण आहे
तुम्ही जेवल्यानंतरही सतत भूक लागत असल्यास, तुमच्या शरीराला उर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज मिळत नसल्याचे हे लक्षण असू शकते
जर तुम्हाला विनाकारण थकवा वाटत असेल, तर शरीर उर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज वापरत नसल्याचे हे लक्षण असू शकते
तुम्हाला अत्यंत कमी दिसत असेल अथवा अंधूक दिसत असेल तर, हे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त असल्याचे लक्षण असू शकते