
सई ताम्हणकरचा क्लासी लुक
सई ताम्हणकरने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावलंय. मराठमोळा लुक असो वा आधुनिक लुक, सईच्या किल्लर अदांनी ती सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच सईने लाल पैठणी साडीतील काही फोटो पोस्ट केले असून थोड्याच वेळात ते व्हायरल झाले आहेत. सईचा हा लुक कमाल असून पैठणीत ती अतिशय सुंदर दिसतेय.
पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राची शान. या साडीत सर्वच सुंदर दिसतात. पण पैठणी साडीत कमालीचा नखरा दाखवत सईने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सईचा हा पैठणी साडीचा साज आणि नखरा कसा आहे नक्की पाहा (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
लाल पैठणी
लाल पैठणीत सईचा नखरा
सईने लाल पैठणी नेसून आपल्या सौंदर्यात भर घातली आहे. गोल्डन बॉर्डर आणि त्यावर जरीवर्क असणारी ही पैठणी अत्यंत क्लासी आणि एलिगंट दिसत आहे. सईने हा लुक अत्यंत सुंदररित्या कॅरी केलाय. महाराष्ट्राची शान असणारी पैठणी सईने अगदी मराठमोळ्या पद्धतीने नेसली आहे.
फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज
सईच्या ब्लाऊजची स्टाईल
पैठणी साडीसह गोल्डन बुट्ट्या असणारा फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज सईने घातलाय. या ब्लाऊजचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या ब्लाऊजला मागे हुक्स लावण्यात आले आहेत. मात्र काठाला असणारा गोल्डन रंग हा बुट्ट्याच्या स्वरूपात ब्लाऊजवर दिसून येतोय.
चोकर आणि झुमके
पारंपरिक दागिन्यांची जोड
पैठणी साडीसह तिने पारंपरिक डिझाईन असणारा चोकर नेकलेस परिधान केला आहे आणि त्यासह तिने झुमके घालत हा लुक पूर्ण केलाय. गोल्डन आणि मोती रंगाचे हे दागिने या साडीची शोभा अधिक वाढवत आहेत. तर वेगवेगळ्या पोझ देत सईने आपल्या अदांनी चारचाँद लावले आहेत.
आंबाडा आणि गजरा
महाराष्ट्रीयन हेअरस्टाईल
सईने यासह टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीचा अंबाडा घातला असून त्यामध्ये संपूर्ण आंबाड्यावर गजरा माळला आहे. या लुकमध्ये सई खूपच सुंदर आणि सालस दिसत आहे. तसंच फोटोसाठी तिने दिलेल्या पोझदेखील चाहत्यांना घायाळ करत आहेत.
स्मोकी आईज लुक
सटल आणि ग्लॅमरस लुक मेकअप
सईने यासह ग्लॅम मेकअप केला असून फाऊंडेशन बेस, स्मोकी आईज लुक, डार्क काजळ, कोरलेल्या भुवया असा लुक ठेवला आहे. तर गालावर हायलायटर, कॉन्ट्यूर आणि ब्लशचा वापर करत अधिक सुंदर लुक केलाय. ग्लॉसी लिपस्टिक लावत तिने हा मराठमोळा लुक पूर्ण केलाय.