Sai Tamhankar: सई आणि फॅशन हे सुपर्ब समीकरण आहे. तिचे वेगवेगळे लुक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच सईने रेड समर लुक शेअर केला असून तिच्या चाहत्यांना या फोटोजने वेड लावलंय. पाहा तिचा ग्लॅम लुक.
सई ताम्हणकर नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येते. सईचे विविध लुक तरूण पिढी फॉलो करताना दिसते. साडी असो वा कोणताही वेस्टर्न लुक असो सई प्रत्येक लुक कमालीचा कॅरी करते आणि आपल्या चाहत्यांना खूष करताना दिसते. नुकताच तिने समर रेड हॉट लुक पोस्ट केला असून तिच्या या लुकवर तुफान कमेंट्स होताना दिसत आहेत. तर सईने नेहमीप्रमाणे अगदी सहजरित्या ही फॅशन कॅरी केली आहे. पाहा सईचा हा ग्लॅम लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
[caption id="attachment_539936" align="alignnone" width="1200"] सईने रेड टाईट क्रॉप टॉप आणि त्याखाली टाईट स्लीट स्कर्ट घातला आहे. समर फॅशनला एक नवा साज देत सईने वातावरण अजूनच हॉट केल्याचे दिसून येत आहे.[/caption]
[caption id="attachment_539937" align="alignnone" width="1200"] ब्लॅक हॅटसह सईचा हा लुक सॉलिड आकर्षक आणि पाहातच राहण्यासारखा दिसतोय. सईने हा ग्लॅम लुक करताना फॅशन कोशंट अधिक वाढवल्याचेही दिसून येत आहे.[/caption]
[caption id="attachment_539939" align="alignnone" width="1200"] या लुकसह सईने केस मोकळे सोडले असून त्यांना कर्ल लुक दिलाय आणि वेगवेगळ्या पोझ देत तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलंय.[/caption]
[caption id="attachment_539932" align="alignnone" width="1200"] रेड ड्रेससह तिने कोणत्याही Accessories घातलेल्या नाहीत. त्यामुळे ड्रेस आणि सईचा चेहरा याकडेच चाहत्यांचं लक्ष जातंय. कोणत्याही पार्टीसाठी हा कमालीचा लुक आहे.[/caption]
[caption id="attachment_539937" align="alignnone" width="1200"] यासह सईने ब्लॅक लाँग मोजे आणि त्याखाली ब्लॅक हाय हिल्स घालून तिचा लुक पूर्ण केलाय आणि ग्लॅम लुकला पूर्णत्व दिलंय. सईचा हा लुक व्हायरल होताना दिसतोय.[/caption]
Web Title: Actress sai tamhankar looks stunning in red classy dress mesmerizes fans with her glam