त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात 'हे' पदार्थ टाका
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे चिखल, ओलावा असतो. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकंच गरजेचे आहे. पावसाळ्यात त्वचा रोग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजून आल्यानंतर किंवा बाहेर जाणून आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून आरोग्याची व्यवथित काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर त्वचारोग वाढू लागतात. त्यामध्ये त्वचेला खाज सुटणे, सूज येणे, दुर्गंधी येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)
पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे चेहरा चिकट होणे किंवा तेलकट होऊ लागते. त्वचा चिकट किंवा तेलकट झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात होणारे इंन्फेक्शन्स वाढू नये म्हणून त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. फंगल इंन्फेक्शन्सपासून त्वचेला बचाव करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात घरगुती पदार्थ वापरून अंघोळ करावी. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ टाका
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचा रोग होणार नाही. कडुलिंबाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असतात, जे त्वचा रोग बरे करण्यासाठी फायदेशीर आहेत.कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवर झालेला संसर्ग नाहीसा होतो. घामामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी सुद्धा कडुलिंबाची पाने गुणकारी आहेत. कडुलिंबाचे पाणी बनवण्यासाठी एका भांडयात पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने टाकून उकळवून घ्या. पाण्यात उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी अंघोळीसाठी वापरा. गरम पाण्यात थंड पाणी टाकून वापरावे.
हे देखील वाचा: हाडांमधील ठिसूळपणा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ विटामिन B 12 Vitamin B12युक्त पदार्थांचा समावेश
त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ टाका
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक मिठाच्या पाण्याची अंघोळ करतात. मिठाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेवर झालेली जखम आणि त्वचा रोग बरे करण्यासाठी मदत करतात. मिठामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ टाकून अंघोळ करावी. यामुळे खाज किंवा फोड यांसारख्या इतर समस्या उद्भवत नाहीत.