Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणानंतर लगेच झोपणं शरीरासाठी घातक! जाणून घ्या शतपावलीचे फायदे

जुनं ते सोनं उगाच म्हणत नाही. कारण, पूर्वीच्या लोकांना कोणत्याच प्रकारचे आजार जडत नव्हते. त्यांची जीवनशैली आणि आरोग्य हे उत्तम असायचं. मात्र, आपल्या पिढीमध्ये मानसिक आणि शारिरीक आजारांंचं जाळं पसरलं आहे. या आजारांवर शतपावलीच्या मदतीने नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

  • By Madhuraa Saraf
Updated On: May 23, 2023 | 06:49 PM
जेवणानंतर लगेच झोपणं शरीरासाठी घातक! जाणून घ्या शतपावलीचे फायदे
Follow Us
Follow Us:

आजच्या धावत्या जीवनशैलीमुळे(lifestyle) आणि खाण्यापिण्यामुळे (unhealthyfood) अनेक आजार (lifestyle diseases) जडले आहेत.  काही चुकीच्या सवयी देखील यासाठी कारणीभूत आहेत, जसं की जेवणानंतर लगेच झोपणे.  अनेकांना जेवण झाल्यावर लगेच झोपायला आवडते. जेवल्यानंतर लगेच झोपण्याची चूक कोणीही करू नये. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल किंवा आजारांपासून दूर राहायचे असेल तर जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी काही पावले चालण्याची सवय लावा.(walk for few steps)

पूर्वीच्या काळी जेवणानंतर फेरफटका मारण्याची पद्धत होती. त्याला शतपावली म्हटलं जायचं. ही शतपावली का बरं केली जात असावी असा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तविक, अन्न खाल्ल्यानंतर चालणे किंवा फिरणे यामुळे पचनक्रिया सुधारते आणि तुमचे आरोग्यही चांगले राहते. आयुर्वेद जेवणानंतर चालण्याच्या क्रियेवरही भर देतो. आयुर्वेदानुसार खाल्ल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने किमान 100 पावलं म्हणजे शतपावली घालावी.  यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

[read_also content=” वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खास शाकाहारींसाठी !!! https://www.navarashtra.com/lifestyle/protein-food-for-vegetarians-nrms-403065/”]

जेवण झाल्यावर शतपावली का करावी?

 उत्तम पचन: आयुर्वेदानुसार, अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया जलद होते, म्हणजेच तुम्ही जे खाल्ले आहे ते लवकर पचते. चालण्याने अन्न पटकन पचण्यास मदत तर होतेच, शिवाय पोषकद्रव्ये जलदपणे शोषून घेणेही सोपे होते. चालण्याने अपचन, पोटदुखी आणि पोटफुगीचा त्रास होत नाही.

मेटाबॉलिझम वाढते: जेवणानंतर चालल्याने चयापचय  (metabolism) गतिमान करते, जे पोषक त्वरीत शोषण्यास आणि अन्न लवकर पचण्यास मदत करते. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.

रक्तातील साखरेचं नियंत्रण: अन्न खाल्ल्यानंतर चालण्याची सवय तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (blood sugar control) स्थिर ठेवण्याचे काम करते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही प्रत्येक जेवणानंतर चालायला हवे.

वजन नियंत्रणात राहील: जेवणानंतर चालल्यास अन्न लवकर पचते. यामुळे तुमच्या पोटावर जास्त भार पडत नाही. कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

चांगली झोप : जेवणानंतर फेरफटका मारल्याने लवकर आणि चांगली झोप लागते. कारण चालण्याने अन्न लवकर पचते, त्यामुळे झोपताना त्रास होत नाही आणि तुम्हाला हलके वाटते.

Web Title: After lunch and dinner walk is must nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2023 | 06:49 PM

Topics:  

  • walk

संबंधित बातम्या

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
1

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.