लग्नानंतर पुरुष का दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात? कारणे ऐकून तुम्हीही हादराल
काळासोबतच अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. आधुनिक काळासोबतच रिलेशनशिप मधल्या गोष्टीही बदलत चालल्या आहेत. एक काळ होता जेव्हा परस्त्री मातेसमान आणि पर पुरुष बंधूसमान मानला जात असे. मात्र काळानुसार आता ही गोष्ट देखील बदलून गेली आहे. आताच्या जगात प्रेमाच्या व्याख्या देखील पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. यात बरेच बदल दिसून आले. आजकाल पुरुष असो वा स्त्री सर्वांनाच लग्नानंतर इतरांच्या पार्टनरबाबत अधिक आकर्षण वाटू लागतं. बऱ्याचदा असे दिसून आले ही की, लग्नानंतरही व्यक्ती इतरांकडे फार सहजतेने आकर्षित होतो. असे घडण्यामागचे नक्की कारण काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. चाणक्य हे केवळ तत्त्वज्ञ नव्हे, तर समाजशास्त्राचेही जाणकार होते.
त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर भाष्य केले आहे. यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे ‘मानवी वर्तन आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत’. आजच्या काळातही चाणक्याचे विचार आधुनिक रिलेशनशिपवर प्रकाश टाकणारे आहेत. इतरांच्या जोडीदाराबाबत वाटणारे आकर्षण हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. इतरांच्या जोडीदाराबाबत हे आकर्षण का निर्माण होत आणि याची कारणे काय हे या नीतिशास्त्रात सांगण्यात आले आहेत.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आभासी आकर्षण असणे
आचार्य चाणक्याच्या मते, जी गोष्ट सहज मिळत नाही त्याबाबत आपल्या मनात आकर्षण वाढू लागते. इतरांच्या जोडीदाराकडे पाहताना आपण फक्त त्याचं रंग-रूप, वागणूक आणि त्यांच्या आयुष्यातील आनंद पाहतो, ज्यामुळे आपल्या मनात एक काल्पनिक आकर्षण निर्माण होत. मात्र हे आकर्षण फक्त बाह्य देखाव्यावर आधारित असते जे वास्तव्यापासून फार दूर असते. याची जाणीव चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात करून दिली आहे.
नवीनतेच आकर्षण
मनुष्याची वृत्तीतच ती आहे की याला नेहमीच नवीन गोष्टी हव्या असतात. मानवी मनाला नेहमीच नवीनतेची ओढ असते. मीच नवीनतेची ओढ असते. चाणक्य म्हणतात, जेव्हा एकाच व्यक्तीसोबत दीर्घकाळ राहतो, तेव्हा आपण त्यांच्या उणिवांवर अधिक लक्ष केंद्रित करू लागतो. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीबाबतच आकर्षण हे त्याहून फार तीव्र असत. मात्र, या आकर्षणामुळे नात्यातील बांधिलकी गमावण्याचा धोका निर्माण होतो.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मनातील असमाधान
चाणक्याच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच वैवाहिक जीवन समाधानी नसेल तर त्या त्याच मन दुसऱ्याच्या जोडीदाराकडे अधिक आकर्षित होऊ लागतं. नातेसंबंधांमधील संवादाचा अभाव, विश्वासाचं तुटणं, किंवा भावनिक गरजा पूर्ण न होणं अशा गोष्टी हे आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात. चाणक्याच्या मते, संवाद आणि परस्पर समजूतदारपणा हा अशा समस्या सोडवण्यासाथीचा एक प्रभावी मूलमंत्र आहे.
चाणक्याच्या नीतिशास्त्रातून आपल्याला मानवी स्वभावाची आणि नातेसंबंधांची सखोल माहिती मिळते. इतरांच्या जोडीदाराबाबत वाटणार आकर्षण ही एक नैसर्गिक भावना आहे मात्र यावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. यासाठी समाधान, संवाद आणि आत्मपरीक्षण यांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.