
फोटो सौजन्य - Social Media
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ दिसणार आणि सामान्यपेक्षा मोठा व तेजस्वी दिसणार. ही घटना आकर्षक असली तरी भारतातून पाहता येणार नाही.
या दोन दिवशी पहाटे आकाशात तेजस्वी गुरु ग्रह चंद्राजवळ दिसणार आहे. -२.६ मॅग्निट्युडचा गुरू साध्या डोळ्यांनी स्पष्ट दिसेल. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतरही हे दोघे जवळजवळ दिसण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमधील सर्वात थरारक आणि प्रतिक्षित घटना म्हणजे जेमिनिड्स उल्कावर्षाव.
महिन्याच्या शेवटी चंद्र आणि कडी असलेला शनी ग्रह एकत्र दिसणार आहेत. सूर्यास्तानंतर पूर्व-दक्षिण दिशेला हे आकर्षक दृश्य पाहता येईल. या सर्व घटनांचे निरीक्षण करण्यासाठी दादर येथील सावरकर स्मारक पटांगणात मोफत दूरदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे. खगोलप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुयोग देशमुख यांनी केले आहे. डिसेंबर महिना खऱ्या अर्थाने ‘आकाशोत्सव’ ठरणार आहे.