फोटो सौजन्य - Social Media
जटींगा आसाम
जटींगा हे आसाममधले विचित्र ठिकाण आहे. विचित्र कारण येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात एक विचित्र गोष्ट घडते. ही गोष्ट दरवर्षी घडते. येथे या महिन्यांमध्ये दररोज हजारो पक्षी आकाशातून खाली मृतावस्थेत पडतात. ते का पडतात? कुणाला माहित नाही पण येथील स्थानिक या घटनेला भुताटकी समजतात.
खाबा किल्ला, जैसलमेर
राजस्थानचा खाबा किल्ला जैसलमेर मध्ये स्थित आहे. येथे पहिले पालीवाल समाजाची वस्ती होती. स्थानिकांचे म्हणणे आहे की या किल्ल्यावर हवा नेहमी जड वाटते आणि नेहमी आपल्या मागून कुणी तरी येतंय याचा भास वाटतो.
भानगढ किल्ला, राजस्थान
भानगढ किल्ला राजस्थानमधील प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला दिवसा उघडा असतो तर रात्री नागरिकांना येथे फिरण्यास सक्त मनाई आहे. येथे एका तांत्रिकाने श्राप दिला होता. त्यामुळे हा किल्ला शापित आणि भयाण आहे.
डुमस बीच, गुजरात
या ठिकाणी आधी अंतसंस्कार विधी पार पडत होते. त्यामुळे येथील वातावरणात अजूनही वाऱ्यात लोकांची कुजबुज जाणवते. त्यामुळे येथे लोकांची चहरपहर दिवसाच असते.
अग्रेसनची विहीर, दिल्ली
दिल्लीमध्ये ६० फूट खोलीवर स्थित असलेली अग्रेसनची विहीर फिल्म शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. असे म्हंटले जायचे की पूर्वीच्या काळी या विहिरीचे पाणी लोकांना आकर्षित करून बुडवायचे.
अशा अनेक जागा आहेत, जेथील अनेक कथा प्रसिद्ध आहेत.






