आलिया भट्ट 'अशा' प्रकारे घेते त्वचेची काळजी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयामुळे सगळकींकडे प्रसिद्ध आहे. ती तिच्या सोशल मीडियावर नेहमी अक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. ती तिच्या केसांची, त्वचेची खूप काळजी घेते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर मॉर्निग स्किन केअर रुटीन सांगितले आहे. हे तुम्ही देखील नक्की फॉलो करून पहा.
अनेक महिला चमकदार सुंदर त्वचेसाठी बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरतात. पण त्याचा फारसा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो केले पाहिजे.यामुळे तुमची त्वचा उठावदार आणि सुंदर दिसेल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवतात. तेलकट त्वचेवर पिंपल्स आल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने सांगितलेले स्किन केअर रुटीन सांगणार आहोत. जे तुम्ही दैनंदिन जीवनात रोज करून पहा.(फोटो सौजन्य- instagram)
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आलिया हलक्या दर्जाचे क्लिंझर घेऊन चेहरा स्वच्छ करते. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाऊन त्वचा कोरडी होत नाही.
सॉफ्ट क्लींजरने चेहरा स्वच्छ करून झाल्यानंतर त्वचेला टोनर लावते. टोनर लावल्याने त्वचेवरील घट्टपणा कायम टिकून राहतो. तसेच त्वचा चमकदार दिसू लागते.
टोनर लावून झाल्यानंतर ती सीरम लावते. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य ते सीरम निवडावे. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ती पेप्टाइड सीरम वापरते.
त्वचा हायड्रेट करण्यासाठी सीरम लावून झाल्यानंतर ती मॉइश्चरायझर वापरते. ज्यामध्ये सेरामाइड्स असल्याने त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते.
सूर्य किरणांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात SPF 50 सनस्क्रीन आलिया त्वचेला लावते. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे होणारे नुकसान टाळता येते.
सगळ्यात शेवटी आलिया ओठांना लिप बाम लावते. यामुळे ओठांवर ओलावा टिकून राहतो. ओठांसाठी लिप बाम खूप महत्वाचे असल्याने तुम्ही देखील स्किन केअरमध्ये लिप बामचा समावेश करू शकता.