Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनुवांशिक विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ‘अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट’ वरदान! ११ हजारांहून अधिक जीनोमिक कन्सल्टेशन्स पूर्ण

अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूटने ११ हजारांहून अधिक जीनोमिक कन्सल्टेशन्स पूर्ण करून अनुवांशिक विकारग्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 23, 2025 | 05:01 PM
अनुवांशिक विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ‘अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट’ वरदान! ११ हजारांहून अधिक जीनोमिक कन्सल्टेशन्स पूर्ण
Follow Us
Close
Follow Us:

अनुवांशिक विकार समजून घेण्यासाठी आणि त्यावर योग्य उपचार मिळवण्यासाठी ‘अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट’ मोठं वरदान ठरत आहे. अपोलो हॉस्पिटल्स समूहाने जाहीर केल्याप्रमाणे, जीनोमिक कन्सल्टेशन आणि मॅनेजमेंटची संख्या तब्बल ११ हजारांवर पोहोचली आहे. हे यश म्हणजे जीनोमिक्सला आरोग्यसेवेत मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

मासेप्रेमींसाठी खास! सुगंधित आणि लज्जतदार चवीने भरलेली डिश; जाणून घ्या रेस्टॉरंट स्टाईल ‘बटर गार्लिक प्रॉन्स’ रेसिपी

भारताची अनुवांशिक रचना अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. देशभरातील ४ हजारांहून अधिक वांशिक गट, तसेच आंतरजातीय आणि अंतरधर्मीय विवाहांमुळे विविध आजारांचे नमुने समजून घेणे आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत जीनोमिक चाचण्या आणि सल्लामसलत रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट सध्या मुंबईसह १२ प्रमुख शहरांमध्ये कार्यरत असून, येथे ३० हून अधिक क्लिनिकल जेनेटिसिस्ट्स आणि काउन्सलर्स कार्यरत आहेत. निदान, वैयक्तिकृत उपचार योजना आणि रुग्णसेवेपर्यंत सर्वसमावेशक सेवा येथे दिल्या जातात.

अपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्षा डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले की, “जीनोमिक्सच्या माध्यमातून आम्ही आरोग्यसेवा अधिक वैयक्तिकृत आणि प्रतिबंधात्मक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. ११,००० कन्सल्टेशन्सचा टप्पा गाठणे म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जीनोमिक्सचा प्रभाव स्पष्ट करणारा टप्पा आहे.”

अभिनेत्री सोहा अली खान म्हणाल्या, “आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे एवढेच नाही; तर ते योग्य माहिती, जागरूकता आणि लवचिकता असणे आहे. आज, जीनोमिक्स आपल्याला ते ज्ञान प्रदान करते. ते लोकांबद्दल,कुटुंबांबद्दल आणि आपल्याला मिळालेल्या कथांबद्दल आहे.ते आपल्याला धोके लवकर ओळखण्यास, प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार काळजी घेण्यास आणि अनिश्चिततेचे रूपांतर निरोगी निवडींमध्ये करण्यास मदत करते. जीनोमिक्समधील ११,००० कंसल्टेशन्स पूर्ण केल्याचा आनंद साजरा करत असताना, मला वाटते की आमची जबाबदारी स्पष्ट आहे: जीवनात परिवर्तन घडवून आणणारी ही प्रगती केवळ काही लोकांसाठी नाहीत तर प्रत्येक समुदायासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध झाली पाहिजे.”

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बटाट्याचा वापर, त्वचा आतून स्वच्छ आणि तेजस्वी

ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ. अनुपम सिब्बल यांनी सांगितले की, “अनुवंशशास्त्र आजार समजून घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. आमचं ध्येय म्हणजे प्रतिबंधात्मक जीनोमिक्स, पुनरुत्पादक जीनोमिक्स, विशेष जीनोमिक्स आणि ऑन्को-जेनेटिक्ससारख्या क्षेत्रांत अचूक निदान व उपचार पर्याय रुग्णांपर्यंत पोहोचवणे.” अशा प्रकारे, अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट केवळ निदानापुरतं मर्यादित न राहता, रुग्ण आणि कुटुंबांसाठी अधिक निरोगी आणि सुरक्षित भविष्य घडवण्याच्या दिशेने कार्यरत आहे.

Web Title: Apollo genomics institute a boon for patients suffering from genetic disorders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • Apollo

संबंधित बातम्या

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ कंपनीचे नाव; BCCI ला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर
1

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ कंपनीचे नाव; BCCI ला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.