डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा बटाट्याचा वापर
कामाच्या धावपळीमध्ये महिला आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा व्यवस्थित काळजी घेत नाही. मानसिक तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, कामाचा वाढलेला तणाव, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरासोबतच त्वचेची गुणवत्ता सुद्धा खराब होऊन जाते. त्यामुळे कायमच आरोग्य, केस आणि त्वचेची काळजी घ्यावी. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळे डाग किंवा डोळ्यांखालील त्वचा काळी होऊन जाते. डोळ्यांखाली आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते आणि त्वचा अतिशय निस्तेज, आजारी पडल्यासारखी वाटते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स वाढू लागतात. हे डाग घालवण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम, लोशन आणि सीरम लावले जातात. पण यामुळे काही दिवसांपुरतीच त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसते.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. पण तरीसुद्धा त्वचेवर नैसर्गिक ग्लो येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. बटाट्यामध्ये असलेल्या थंडाव्यामुळे डोळ्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी होते आणि डोळे कायमच निरोगी राहतात. बटाटा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.
चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करावा. तांदळाच्या पिठाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. फेसपॅक तयार करताना वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर हळद आणि बटाट्याचा रस टाकून व्यवस्थित पेस्ट तयार करा तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन त्वचा अतिशय निस्तेज करून टाकते. तांदूळ आणि बटाट्याचा फेसपॅक लावल्यामुळे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन कमी होईल.
डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी ठरेल. वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात बटाट्याचा रस मिक्स करा. तयार केलेला लेप डोळ्यांभोवती लावून काहीवेळ तसाच ठेवा. सकाळी उठल्यानंतर लेप पाण्याने धुवून टाका. हा लेप नियमित लावल्यास डोळ्यांखालील काळी झालेली त्वचा पुन्हा उजळण्यास मदत होईल.