Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीठ आणि साखरेतून तुम्ही खाताय प्लास्टिक! अभ्यासातून धक्कादायक खुलासा

जेवणामध्ये मीठ नसेलतर जेवणाची चव बेचव लागते. तसेच जर चहामध्ये साखर टाकली नाहीतर चहा कडू लागते. त्यामुळे दैनंदिन आहारात साखर आणि मीठाचा वापर केला जातो. पण नुकतंच करण्यात आलेल्या दाव्यामध्ये भारतीय ब्रँडच्या साखर आणि मीठामध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. आढळून आलेले प्लस्टिक आरोग्यासाठी घातक आहे.मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 14, 2024 | 12:17 PM
भारतामधील मीठ, साखरेच्या ब्रँडमध्ये आढळून आले प्लस्टिक

भारतामधील मीठ, साखरेच्या ब्रँडमध्ये आढळून आले प्लस्टिक

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच स्वयंपाक घरांमध्ये मीठ आणि साखर आढळून येते. मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चवच लागत नाही. मीठाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो तर साखरेचा वापर गोड पदार्थ, चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी केला जातो. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचा समावेश आहे. पण आता मीठ आणि साखर खाणे आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहे.मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतामधील बाजार पेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. तसेच भारतामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या ब्रँडचे साखर आणि मीठामध्ये प्लस्टिकचे कण आढळून आले आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेने ‘मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर’ या कंपनीने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. यासाठी संस्थेने पांढरे मीठ, सेंद्रिय खडे मीठ, समुद्री मीठ आणि कच्चे मीठ यांच्यासह इतर १० वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच त्यांनी ऑनलाईन आणि बाजारपेठेमधून खरेदी करण्यात आलेल्या साखरेच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यात फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि इतर तुकडे आढळून आले आहेत. तर यामध्ये सापडलेल्या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 0.1 मिलिमीटर एवढा आहे.

हे देखील वाचा: सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजतात? मग उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने

मीठ आणि साखरेमध्ये आढळून आलेले मायक्रोप्लास्टिक्स मानवी आरोग्यसाठी घातक आहे. टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा म्हणाले, आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहे. ही एक चिंतेची बाब असून मायक्रोप्लास्टिक्सचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. मीठामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण 6.71 ते 89.15 तुकडे आढळून आले आहेत आणि साखरेमध्ये 89.15 तुकडे प्रति किलोग्रॅम आढळून आले आहेत. मीठ आणि साखरेमध्ये सापडलेले स्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.

Web Title: Are we eating microplastic through salt and sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 12:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.