डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी 'ही' योगासने करा
बदलती जीवनशैली, सतत काम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत मोबाईल पाहणे इत्यादी गोष्टींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो, जीवनशैलीतील बदल अनेकदा आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेऊन निरोगी जीवनशैली जगणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेची कमतरता शरीरामध्ये जाणवू लागल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. झोपेची कमतरता जाणवू लागल्यानंतर डोळ्यांखाली सूज येण्यास सुरुवात होते. सूज आल्यानंतर हळूहळू डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येऊ लागतात.
चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा खराब होऊन जातो. त्यामुळे दिवसभरातल्या कामातून वेळ काढून 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यामुळे आरोग्यसुद्धा चांगले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांखाली आलेली सूज कमी करण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहरा निर्जीव आणि कोरडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ विटामिन सी युक्त पेयांचा समावेश
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने करा
पश्चिमोत्तासन केल्यामुळे संपूर्ण शरीराला फायदे होतात. हे आसन करताना तुमचे पूर्ण शरीर खाली वाकवा. हे असं केल्याने डोळ्यांच्या खाली आलेली सूज कमी करण्यास मदत होते. तसेच डोळ्यांखालील रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. डोळ्यांच्या खाली रक्तभिसरण वाढल्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढत जातो. त्यामुळे डोळ्यांच्या खाली आलेली सूज हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. हे आसन नियमित केल्यामुळे मेंदूमधील रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि रात्रीच्या वेळी चांगली झोप लागते.
कोणतंही योगासन करण्यासाठी योगा मॅटचा वापर करावा. योगा मॅटवर बसल्यानंतर दोन्ही पाय जमिनीच्या दिशेकडे मोकळे करून बसा.
नंतर दीर्घ श्वास घेऊन शरीर हळूहळू पुढे वाकवा. पुढे वाकल्यानंतर हातांच्या बोटानी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
हे करत असताना तुमचे गुडघे ताठ असायला हवेत. त्यानंतर २ सेकंड या स्थितीमध्ये राहून पुन्हा सामान्य स्थितीमध्ये यावे.
हे आसन नियमित केल्यामुळे शरीरातील ताण कमी होऊन आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल.
हे देखील वाचा: एका जागेवर बसून सतत पाठ दुखते? मग सकाळी उठल्यावर करा ‘ही’ योगासने
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने करा
बालासन केल्यामुळे त्वचा आणि केसांना चांगले फायदे होतात. शरीरातील रक्तभिसरण सुधारून आरोग्य सुधारते. हे आसन केल्यामुळे चेहरा आणि डोळ्यांभोवती रक्तभिसरण वाढवण्यास मदत होते. तसेच डोळ्यांना असलेली सूज कमी होऊन रात्रीच्या वेळी चांगली झोप लागते.
बालासन करताना सगळ्यात आधी योगा मॅटवर बसावे. त्यानंतर श्वास घेताना दोन्ही हात आणि पाय वर करा.
नंतर श्वास सोडताना पुढे वाका. नंतर जमिनीला डोकं टेकवून शरीराला हलकं सोडा आणि रिलॅक्स व्हा.
हे आसन करताना श्वास घ्या आणि श्वास सोडा असे करत राहा. या आसनामध्ये 3 मिनिटं राहून नंतर सामान्य स्थितीमध्ये यावे.