Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसात उवांनी भरलेलं डोकं सारखं खाजवताय? मग चिंता सोडा, आजच ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा

पावसाळ्यातील ओलसरपणामुळे केसांमध्ये उवा आणि लीखं पटकन वाढतात ज्यामुळे केस खाजवून खाजवून जीव कासावीस होतो अशात काही घरगुती उपाय करून तुम्ही यांना आपल्या केसांतून पळवून लावू शकता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 21, 2025 | 09:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा हा ऋतू जितका मोहक आणि आनंददायी असतो तितक्याच काही आरोग्याच्या समस्या देखील घेऊन येतो. चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळेजण पावसात भिजून मजा करत असले तरी खरे आयुष्य थोडे वेगळे असते. या काळात सर्दी, खोकला, ताप या समस्या तर होतातच, पण आणखी एक त्रास म्हणजे डोक्यात उवा होणे.

Inflation In India : भारतातील ‘या’ 10 राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

पावसाळ्यात उवा का वाढतात?

या काळात वातावरणात खूप ओलसरपणा असतो. केस सतत ओले राहिल्यामुळे उवा वाढण्यास अनुकूल परिस्थिती मिळते. जर या ओलसरपणात अस्वच्छता मिसळली, तर डोक्यात उवा आणि त्यांची लीखं पटकन वाढतात.
याशिवाय, एकमेकांची कंगवी किंवा टॉवेल वापरणे देखील उवा पसरण्याचे मुख्य कारण असते.

उवांवर घरगुती उपाय

रासायनिक औषधं वापरल्याने केस खराब होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने उवा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय येथे दिले आहेत:

कांद्याच्या रसाचा उपाय

साहित्य:

  • २ कांदे
  • नारळ तेल (हवे असल्यास मुलांसाठी)

कृती:

  • कांदे किसून किंवा वाटून त्याचा रस काढा.
  • हा रस थेट केसांच्या मुळाशी लावा.
  • मुलांना लावताना थोड्या नारळाच्या तेलात मिसळून लावावा.
  • डोकं सूती कापडाने झाकून १५ मिनिटे ठेवा आणि मग शॅम्पूने केस धुवा.

Hotel Safety Hack : एकट्या प्रवासातही भीती नको! हॉटेलमध्ये ‘बॉटल ट्रिक’ ठरेल तुमचा सुरक्षा कवच

कडुनिंबाचा काढा

साहित्य:

  • कडुनिंबाची पाने
  • पाणी

कृती:

  • पाने स्वच्छ धुऊन पाण्यात उकळा.
  • पाणी थंड झाल्यावर पाने चोळून त्यातील गुणधर्म पाण्यात मिसळा.
  • हे पाणी स्प्रे बाटलीत भरून शॅम्पूनंतर केसांवर फवारावे.
  • २० मिनिटे तसेच ठेवून नंतर केस धुवावेत.

Mumbai Horror Story: टॅक्सीतून उतरला अन् झाला गायब…आजही

कापूर आणि नारळाचे तेल

साहित्य:

  • ४ कपूर
  • नारळ तेल

कृती:

  • पातेल्यात नारळ तेल गरम करून त्यात कपूर टाका.
  • मंद आचेवर गरम करा आणि झाकण लावून ठेवा जेणेकरून सुगंधित वाफ बाहेर जाऊ नये.
  • थंड झाल्यावर हे तेल केसांमध्ये मुळापर्यंत लावा.
  • १५ मिनिटांनंतर केस शॅम्पूने धुवून टाका.

हे उपाय नियमित केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या उवां पासून मुक्ती मिळू शकते तसेच केसही निरोगी आणि मजबूत राहतात.

Web Title: Are you itching your head full of lice in the rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • Healthy Hair

संबंधित बातम्या

केस गळतीची समस्या होईल कायमची दूर! साजूक तूप आणि अश्वगंधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील घनदाट
1

केस गळतीची समस्या होईल कायमची दूर! साजूक तूप आणि अश्वगंधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील घनदाट

केस कोरडे आणि निस्तेज झाले आहेत? रोजच्या आहारात करा ‘या’ हेल्दी पदार्थांचा समावेश, काही दिवसांमध्ये दिसेल बदल
2

केस कोरडे आणि निस्तेज झाले आहेत? रोजच्या आहारात करा ‘या’ हेल्दी पदार्थांचा समावेश, काही दिवसांमध्ये दिसेल बदल

Hair Care Tips : केसांसाठी नैसर्गिक टॉनिक; एक चमचा बडिशेपचा ‘असा’ करा वापर
3

Hair Care Tips : केसांसाठी नैसर्गिक टॉनिक; एक चमचा बडिशेपचा ‘असा’ करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.