फोटो सौजन्य - Social Media
मुंबईमध्ये स्थित असलेले पवन हंस कॉर्टेज सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. महत्वाचे म्हणजे येथील स्थानिक लोकांना या जागेविषयी एक विशेष भीती आहे. अनेक दशकांपूर्वी येथे घडलेली एक घटना लोकांच्या मनात भीतीच्या सुरुवातीचे कारण ठरले आहे. रेश्मा नावाची एक मुलगी जवळजवळ ८० च्या दशकात जुहूच्या पवन हंस कॉर्टेज या क्षेत्रात राहत होती. अतिशय गुमसुम असणारी ती मुलगी फार एकटक राहत होती. कुणाशीही काही बोलत नव्हती. पण एकदिवस असा आला की पवन हंस कॉर्टेज क्षेत्रातील एका पिंपळाच्या झाडाखाली स्वतःला अगदी मध्यरात्रीच तिने पेटवून घेतले. दुसऱ्या सकाळी झाडाखाली तिचे मृतदेह मिळाले. मृतदेहाच्या शेजारी चाफ्याची सुगंधी फुले पडली होती. त्या घटनेनंतर तो परिसर अगदी ओसाड पडू लागला. त्या ठिकाणी राहणे अत्यंत दूरची गोष्ट अगदी फेरफटकाही कुणी मारत नसे. पाहता पाहता दशके उलटून गेली पण त्या ठिकाणी काही सुधार आला नाही.
२०१५ चा काळ होता. यशराज त्याची टॅक्सी घेऊन रात्रीच्या शेवटच्या भाड्यासाठी पालघर स्टेशनवर थांबला होता. इतक्यात एक म्हातारा त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला ‘दादा, जुहू जाणार का?’ यशराज विचारात पडला. जवळजवळ मध्यरात्र होत आली आहे. यावेळेला इतक्या दूर जाणे काही ठीक नाही. तो हे भाडे घेणारच नव्हता पण त्या म्हाताऱ्याने त्याला दुप्पट भाडे देण्याचा विश्वास दिला, तेव्हा कुठे यशराज तयार झाला. ते दोघेही पालघरहून जुहूच्या दिशेने निघाले. अंतर तसे बरेच दूरचे होते.
यशराजने रात्रीचे भाडे अनेक मारले आहे. पण त्याच्या नशीबात असा ग्राहक पहिल्यांदा आले होता जो इतका शांत आणि एकटक पाहणारा होता. यशराज त्याला बॅक मिररमधून पाहत होता. त्याला काही विचारले असता तो अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात उत्तरे देत होता. तर काही प्रश्नांना दुर्लक्ष! रस्त्याच्या कडेला चाफ्याचे झाड पाहून त्या म्हाताऱ्याने बाजूला गाडी घ्यायला सांगितली आणि यशराजला विनंती केली की ‘दादा, ती फुलं तोडून आणशील का? मी म्हातारा मला नाही जमणार.” यशराज आधी विचारात पडला पण त्याने ती फुलं तोडून आणली आणि त्याला दिली. ते पुढच्या प्रवासाला निघाले असता. पुन्हा म्हातारा गप्प झाला. शेवटी, ते अंधेरीला येऊन ठेपले. जुहूच्या रस्त्याला जात असता यशराजने त्या म्हाताऱ्याला विचारणा केली की, “बाबा, जुहूला आलो आपण. आता कुठे जायचंय? सांगा की…” म्हातारा यशराजला रस्ता दाखवू लागला. तो रस्ता पवन हंस कॉर्टेजच्या दिशेने जात होता. यशराजला या ठिकाणाबद्दल ठाऊक होते. तो आधीच मनातून घाबरलेल्या अवस्थेत होता. बाबाला कारण विचारलं तर बाबा काय सांगत पण नव्हता, म्हणून यशराज अगदी गप्प बसला होता. पवन हंस कॉर्टेजच्या गेटजवळच म्हाताऱ्याने गाडी थांबवली आणि बाहेर उतरला. उतरून गेटच्या दिशेने चालू लागला.
यशराजने त्याला पाहिले. म्हाताऱ्याने डबल भाडं देण्याचा विश्वास दिला होता, ज्याच्या जोरावर यशराज इथपर्यंत आला होता. यशराज त्या म्हाताऱ्याच्या मागे मागे पळत सुटला. पाहता पाहता तो म्हातारा दिसेनासा झाला आणि यशराज पवन हंस कॉर्टेजच्या आत त्या पिंपळाच्या झाडाच्या शेजारी येऊन पोहचला होता. त्याची नजर झाडावर गेली. तिथे एक तरुणी जणू जखिणच फांदीवर लटकली होती. हळूहळू झाड उतरत ती यशराजच्या जवळ येत होती. यशराज ते दृश्य पाहून अगदी स्तब्ध झाला होता. पण यशराजला अचानक जाणीव झाली आणि तो पळत सुटला. पळत पळत तो गेटवरून येऊन आदळला पण त्याने शेजारी पहिले तर तिथे हनुमानाचे मंदिर होते. त्यामुळे त्याच्या जीवात जीव आला. मागे पाहतो तर काय? मागे कुणीच नव्हतं.
यशराज तरी धावत धावत टॅक्सिमध्ये आला. त्याने एकदा पवन हंस कॉर्टेजच्या आत पाहिले तर त्या झाडावर कुणीतरी बसलेले दिसत होते. याने कसलाही विचार न करता टॅक्सी वाऱ्याचा वेगाने पळवली. पुढे एका चहावाल्याच्या शेजारी त्याने गाडी लावली. तिथे चहाचा घोट घेता घेता त्याने त्याच्यासोबत पवन हंस कॉर्टेज येथे घडलेली घटना सांगितली. चहावाला त्याच्यावर भडकला. त्याला म्हणाला “तुला माहिती असून तू का गेलास तिथे?” चहावाल्याने त्याला त्या मुलीची गोष्ट सांगितली की प्रेम प्रकरणामध्ये घडलेली ही गोष्ट होती. मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत लागलं ही गोष्ट त्या रेश्माला पचले नाही आणि त्या झाडाखाली स्वतःला जाळून तिने आत्महत्या केली होती. पण नंतर या कहाणीत नवीन वळण आले. रेश्मा ज्या मुळावर प्रेम करत होती. त्या रमेशलाही रेश्मावर प्रचंड प्रेम होते. शेवटी, तिच्या जाण्यानंतर काही महिन्यांनी रमेशनेही पालघर स्टेशनवर ट्रेनखाली आत्महत्या केली.” चहावाल्याचे हे बोलणे ऐकून यशराजच्या कपाळावर आट्या आल्या. त्याच्यासोबत काय घडलं होतं? याचे उत्तर त्याला मिळाले. तो म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसून रमेशचा होता. चहा हुरकून तो टॅक्सिकडे येऊन ठेपला. आतमध्ये बसून टॅक्सी सुरु केली आणि बॅक मिररमध्ये पाहतो तर काय? पुन्हा तोच म्हातारा मागे बसला होता. तो म्हातारा यशराजला म्हणतो की, “चल मित्रा, पालघर स्टेशनावर मला सोड. माझ्या मृत्यूची वेळ झाली आहे.”