सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अळशीच्या बिया वापरा
सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि छान दिसायचं असतं. यासाठी महिला त्वचेसोबतच शरीराचीसुद्धा खूप जास्त काळजी घेतात. कामानिमित्त सतत बाहेर गेल्यानंतर त्वचा काळवंडून जाते. काळी पडलेली त्वचा पुन्हा एकदा गोरीपान आणि सुंदर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट्स, फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तेच तेच केमिकल उपाय त्वचेवर केल्यामुळे काही प्रमाणात त्वचा खराब आणि रुक्ष होऊन जाते. खराब झालेली त्वचा पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. शिवाय त्वचेवरील नैसर्गिक सौदंर्य वाढण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येने त्रस्त आहात? तर पाण्यात मिक्स करा ‘या’ बिया, चेहऱ्यावर दिसेल ग्लो
त्वचेवर चमक टिकवून ठेवण्यासाठी अळशीच्या बिया अतिशय प्रभावी आहेत. या बियांचा वापर तुम्ही खाण्यासाठी सुद्धा करू शकता. अळशीच्या बिया बाजारात सहज उपलब्ध होतात. अळशीच्या बियांमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी असिड आढळून येते, जे त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर अळशीच्या बियांचे पाणीसुद्धा पिऊ शकता. चेहऱ्यावर अळशीच्या बिया लावण्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. अळशीच्या बियांमध्ये फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन आणि फायटोअॅस्ट्रोजन इत्यादी अनेक घटक आढळून येतात .
अळशीच्या बिया
पाणी
हे देखील वाचा: कोरड्या आणि फ्लॅकी स्किनपासून सुटका हवीये का? 5 घरगुती उपाय ठरतील रामबाण
अळशीच्या बिया वापरून तयार केलेले बर्फाचे खडे काढून संपूर्ण त्वचेवर व्यवस्थित फिरवून घ्या. बर्फाच्या खड्डयाने त्वचेवर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. तयार केलेला बर्फ वेगवेगळ्या पद्धतीने पाच ते सहा वेळा त्वचेवर फिरवा त्यानंतर काहीवेळ त्वचा सुकण्यासाठी ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळदार होण्यास मदत होईल.