ओठांना लिपबाम लावण्याचे फायदे
राज्यभरात सगळीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हिवाळा ऋतू सगळ्यांचं खूप आवडतो. पण या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा पूर्णपणे कोरडी होऊन जाते. कोरड्या झालेल्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाहीतर त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. त्यामुळे थंडीमध्ये त्वचेला सूट होतील असे प्रॉडक्ट वापरावे. थंडीमध्ये सर्वाधिक त्रास ओठांना होतो. ओठ पूर्णपणे सुकल्यासारखे आणि कोरडे होऊन जातात. अनेकदा थंडी वाढल्यानंतर ओठ जास्तच कोरडे होऊन जातात आणि ओठांमधून रक्त येऊ लागते. अशावेळी अनेक महिला व्हॅसलिन किंवा क्रीम्स लावतात.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केस गळून पातळ झाले आहेत? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
थंडीच्या दिवसांमध्ये ओठ आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी. ओठांमधून रक्त आल्यानंतर किंवा ओठ कोरडे झाल्यानंतर अनेक महिला महागड्या क्रीम्स किंवा लिपबाम लावतात. पण विकतचे लिपबाम आणून लावण्यापेक्षा घरी बनवलेले लिपबाम लावावे. जेणेकरून ओठांची त्वचा कोरडी पडणार नाही. घरी बनवलेले होममेड लिपबाम ओठांमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होममेड लिपबाम बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने लिपबाम तयार केल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
हे देखील वाचा: केस गळतीवर प्रभावी ठरतील ‘ही’ गुणकारी फुले, झपाट्याने होईल केसांची वाढ
घरी तयार केलेले लिपबाम तुम्ही दिवसभरातून तीन ते चार वेळा लावू शकता. यामुळे ओठ जास्त कोरडे होणार नाहीत. ओठांमधील ओलावा कायम टिकून राहील. सुंदर आणि चमकदार ओठ हवे असल्यास नियमित ओठांना लिपबाम लावावे. घरगुती पदार्थांपासून बनवलेले लिपबाम ओठांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे ओठांवर नैसर्गिक चमक टिकून राहील.