फोटो सौजन्य - Social Media
आजकालच्या लोकांचे आयुष्यात फक्त नि फक्त कष्ट आहे. आठवड्याचे सहा दिवस काम करतात. एक दिवस सुट्टीचा मिळतो, त्यातही घराची साफ सफाई, जुन्या सामानाची डागडुज्जी तसेच इतर कामे असतातच. अशा मध्ये लोकांचे आयुष्य फार कष्टाचे बनले आहे. सकाळपासून कष्ट करत रात्री सुखाचे घास खाणे कुणालाही नाही आवडणार. पण तुम्हाला माहिती आहे का? रात्रीचे जेवण टाळण्याचेही अमाप फायदे असतात. काय फायदे असतात? चला तर मग जाणून घेऊयात. जर आपण कमी खात आहोत किंवा अन्नाचे सेवन बऱ्यापैकी कमी करत आहोत. तर नक्कीच वेट लॉससाठी याचा फायदा होणार आहे. रात्रीचे जेवण खाणे टाळल्यामुळे कॅलरीजचा नाश होतो. जर ओव्हरवेटचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. असे केल्याने वजन कमी करण्यामध्ये काही प्रमाणात मदत मिळेल. परंतु, असे करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
असे दिसून आले आहे की, रात्रीचे जेवण टाळणारे लोक वेळेवर झोपतात आणि त्यांची उठण्याची वेळ देखील ठरलेली असते. यामुळे त्यांचा शारीरिक घडणारा वेळ (सर्काडियन क्लॉक) व्यवस्थित काम करत असतो. जेवण न केल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरणाची समस्या टळते, ज्यामुळे अति खाण्याची समस्या कमी होते. रात्री उशिरापर्यंत खाण्याची आणि खाण्याची जाणीव नाही राहिल्यामुळे वजन वाढण्याची संभाव्यता कमी होते.
रात्री जेवण न केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील हार्मोन्स देखील योग्यप्रकारे कार्य करतात. यामुळे झोपेसाठी उत्तम वातावरण तयार होतो आणि गाढ झोप लागते. तसेच, तणाव, चिंता, आणि इतर मानसिक त्रास देखील कमी होतो, कारण हार्मोन्सच्या समतोलामुळे मूड देखील चांगला राहतो. रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांना पोट फुगण्याची समस्या जास्त होते. हे पचनाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे होतं. जर तुम्ही रात्री जेवण टाळले तर तुमच्या पोटास आराम मिळतो, आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते. त्याचबरोबर, मेटाबोलिझम (आहार प्रक्रिया) सुधारणार असतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि दिवसभर चांगले कार्य करता येते.
अशा समस्यांपासून वाचण्यासाठी, जर रात्री जेवण करण्याची गरज असेल, तर ते झोपण्याच्या किमान तीन तासाआधी केले पाहिजे. यामुळे तुमच्या पचन प्रक्रियेला वेग आणि आराम मिळतो, आणि शरीर हवं तितकं आरामदायक होते.