फोटो सौजन्य - Social Media
मायग्रेनचा त्रास फार त्रासदायक असतो. नेहमीची ती डोकेदुखी असाहाय्य असते. मायग्रेनच्या रुग्णांना सतत या त्रासाला सामोरे जावे लागते. यामध्ये तणाव घेतल्यास या त्रासाला आणखीन एखादी पालवी फुटते. अशामध्ये या त्रासापासून दूर जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत, अनेक औषोधोपचार आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? या त्रासाला कमी करण्यासाठी संगीतही मोठे योगदान देते. चला तर मग जाणून घेऊयात, काय आहे नेमकं तथ्य?
मायग्रेनचा त्रासात रुग्णाला डोके दुखीचा भयंकर त्रास होतो. अशामध्ये रुग्णाला मोठ्या आवाजातील संगीताचा किंवा इतर कोणत्याही ध्वनी प्रदूषणाचा भयंकर त्रास होतो. पण, जर ते संगीत एका लेव्हलमध्ये असेल तर नक्कीच त्याचा फार फायदा होत असतो. संगीत मानसिक त्रासाला रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी फायद्याचा आहे. मायग्रेन थांवण्यासाठी अनेक संशोधन करण्यात येत आहे, अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये लोक साउंड थेरेपीला जास्त पसंती देत आहेत.
काही लोकांचे म्हणणे आहे की संगीतामुळे मायग्रेनचा वेदनांपासून आराम मिळू शकतो. मात्र, यासाठी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. 2021 मध्ये माइग्रेनचा त्रास असलेल्या 20 रुग्णांवर संशोधन करण्यात आले. यामधील जवळपास निम्म्या सहभागींनी तीन महिन्यांपर्यंत दररोज संगीत ऐकल्यानंतर माइग्रेनच्या झटक्यांमध्ये 50% घट झाल्याचे दिसून आले. 2013 मध्ये माइग्रेनग्रस्त मुलांवर करण्यात आलेल्या संशोधनात आढळले की संगीत थेरपीमुळे डोकेदुखीत जवळपास 20% घट करता येऊ शकते. तथापि, ही 20% घट प्लेसीबो गटाच्या निकालांसारखीच होती. ताण कमी करण्यासाठी संगीत थेरपीचा वापर करून बरेच संशोधन झाले आहे. माइग्रेनने ग्रस्त असलेल्या 70% लोकांसाठी ताण हा एक महत्त्वाचा ट्रिगर मानला जातो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या रुग्णांनी ताण आणि तणावापासून चार हाथ लांब राहावे.
विविध संगीत प्रकारच्या माध्यमातून मायग्रेन कमी केला जातो. यामध्ये शास्त्रीय संगीत आहे. जैज तसेच विश्व संगीताचा समावेश आहे. ४० ते ८० बिट्स प्रति मिनिट त्यामध्ये वाद्यांच्या आवाजाची कमतरता ऐकणाऱ्याच्या कानाला एक वेगळाच आनंद देते आणि हे बिट्स खूप छान कामदेखील करतात. मेंदू दोन वेगवेगळ्या स्वरसंगतींमधील फरक मिटवण्यासाठी एक तिसरा स्वर तयार करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला बायनॉरल बीट्स म्हणतात. हे दोन खऱ्या स्वरांमधील अंतर दर्शवतात. बायनॉरल बीट्स मेंदूच्या तरंगांमध्ये बदल घडवून आणण्यास सक्षम असतात आणि यामुळे माइग्रेनच्या वारंवारतेत घट करण्यास तसेच वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते.