उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा लोक सकाळी उठल्यानंतर गरमागरम चहाचे किंवा कॉफीचे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या रसाचे सेवन करावे. आल्याचा रस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. आल्यामध्ये आढळून येणारे दाहक विरोधी गुणधर्म साथीच्या आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. सर्दी, खोकला आणि छातीत जड होणे इत्यादीब समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. साथीच्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आल्याचे पाणी प्यावे.
आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रोटीनशेक पिण्याऐवजी नियमित आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म इतर आजारांपासून शरीराचा बचाव करतात.
आल्यामध्ये मळमळ कमी करणारे गुणधर्म आढळून येतात. शिवाय यामुळे डोकेदुखी आणि उलटीचा त्रास कमी होतो. प्रवासाला जाण्याआधी आल्याच्या रसाचे सेवन केल्यास उलटी किंवा मळमळ होण्याचा त्रास होणार नाही. शिवाय आल्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवणार नाही.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. हेच हानिकारक घटक शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.