दही दालचिनी खाण्याचे फायदे
लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा दही खायला खूप आवडत. काहींना साखरेसोबत तर काहींना मीठासोबत. अनेकदा घरात भाजी बनवली नाही की अनेक लोक दह्याचे सेवन करतात. दही खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दह्यामध्ये असलेले गुणधर्म शरीर थंड करण्यासाठी मदत करतात. उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये दह्याचे सेवन केले जाते. शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दह्याचे सेवन करावे. 100 ग्रॅम दह्यामध्ये 11.1 ग्रॅम प्रथिने आढळून येतात. शिवाय यामध्ये कॅल्शियम, प्रोबायोटिक्स , विटामिन बी 12 , ऊर्जा इत्यादी अनेक घटक असतात, जे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर दही आणि दालचिनी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात कॅल्शियमची पातळी वाढते. (फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
दही आणि दालचिनीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून तीनदा दही आणि दालचिनीचे सेवन करू शकता. शिवाय मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्धा वाटी दह्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करून खाल्यास कॅल्शियमची पातळी वाढून आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दह्यात दालचिनी मिक्स करून खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
भारतीय मसाल्यांमध्ये दालचिनीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दालचिनीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते शिवाय सुगंध वाढण्यास मदत होते. दालचिनीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म, अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरात हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. शिवाय दह्यामध्ये दालचिनी मिक्स करून खाल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
दही आणि दालचिनीच्या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित या पदार्थांचे सेवन करावे. ज्या महिला किंवा पुरुषांना मधुमेहाचा धोका असेल अशांनी दही दालचिनीचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. अशावेळी आहारात दही आणि दालचिनीचे सेवन करावे. दही खाल्यामुळे लगेच पोट भरते आणि भूक लागत नाही. तर दालचिनीच्या सेवनामुळे चयापचय वाढते आणि कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी दही आणि दालचिनीचे सेवन करावे.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हाडांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी दही आणि दालचिनीचे सेवन करावे. यामुळे हाडांमधील कॅल्शियम वाढते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. दह्यामध्ये आढळून येणाऱ्या प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. तसेच दह्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात. शिवाय यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.