हातापायांना मुंग्या आल्यानंतर करा हे उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घेतली नाहीतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात अनेकांना हातापायांच्या वेदनांना सामोरे जावे लागते. हातापायांमध्ये सतत मुंग्या येणे, हात पाय दुखणे, चालताना किंवा खाली बसताना त्रास होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये उद्भवू शकते. हातापायांमधील वेदना वाढल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून जाते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्यामध्ये संधिवाताचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो. ज्यामुळे हातपाय दुखू लागतात. शिवाय हातापायांची बोटे आणि हाडे वाकडी होऊन चालताना त्रास होतो. सतत हातपाय दुखू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये हातापायांना येणाऱ्या मुंग्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय नियमित फॉलो केल्यामुळे हातापायांना येणाऱ्या मुंग्यांपासून आराम मिळेल.
शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये अनेक लोक व्यायाम करत नाहीत. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम करण्याआधी नियमित वर्म अप करणे आवश्यक आहे. त्यानंतर कमी वेळचे व्यायाम प्रकार करावे. जास्त वेगाने व्यायाम किंवा योगासने करू नयेत. असे केल्यामुळे हातापायांना इजा होण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे शरीराचे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात. शिवाय तापमान कमी असते. ज्यामुळे शरीराचे रक्तभिसरण कमी प्रवाहात होते, ज्यामुळे सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये संधिवात असेल्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. संधिवाताची समस्या असलेल्या लोकांनी गरम पाण्याची अंघोळ, मसाज करणे, हीटिंग पॅडचा वापर करावा. यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होईल.
हिवाळ्यात सांध्यांना सूज येते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. सांध्यांमध्ये सूज आल्यानंतर कडकपणा आणि वेदना वाढू लागतात. तसेच वातावरण थंड असल्यामुळे सांध्यांना आणखीनच सूज येऊ लागते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उबदार कपडे परिधान करणे, नियमित हलका व्यायाम करणे, शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने सूज आल्यानंतर योग्य औषध उपचार करणे आवश्यक आहे.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते.शरीरात खनिजे, पोषक घटक, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम इत्यादी घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडते. त्यामुळे आहारात फळे, भाज्या, पालेभाज्या, ड्रायफ्रूट इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.